आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोपी अटक‎:दोन वर्षापासून गायब, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाची कारवाई‎

यवतमाळ‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन वर्षापासून बेपत्ता असलेल्या‎ एका १७ वर्षीय अल्पवयीन‎ मुलीसह आरोपीला वर्धा‎ जिल्ह्यातील देवळी येथून ताब्यात‎ घेण्यात अनैतिक मानवी वाहतूक‎ प्रतिबंध विभागाला यश आले. ही‎ कारवाई गुरूवार, दि. ६ एप्रिलला‎ करण्यात आली असून देविदास‎ माघाडे रा. बोरी ता. दिग्रस असे‎ ताब्यात घेण्यात आलेल्या‎ आरोपीचे नाव आहे.‎ या प्रकरणी पोलिस सूत्रांकडून‎ मिळालेल्या माहितीनूसार, दिग्रस‎ तालुक्यातील एका अल्पवयीन‎ मुलीला देविदास माघाडे याने फुस‎ लावून पळवून नेले होते. या‎ प्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी दि. ३‎ जानेवारी २०२२ रोजी दिलेल्या‎ तक्रारीवरून दिग्रस पोलिसांनी‎ विविध कलमान्वये गुन्हे नोंद केले.‎ त्यानंतर मुलीसह आरोपीचा शोध‎ घेण्यात आला.‎

मात्र ते मिळून येत नसल्याने या‎ प्रकरणाचा तपास पोलिस‎ अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी‎ अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध‎ विभागाकडे सोपवली होती.‎ त्यानंतर पोलिस निरीक्षक विलास‎ कुळकर्णी यांनी सायबर सेलच्या‎ तांत्रीक सहायाने या गुन्ह्यांचा‎ तपास सुरू केला.‎ दरम्यान मिळणाऱ्या लोकेशनच्या‎ आधारे पोलिसांनी वर्धा‎ जिल्ह्यातील देवळी येथून पिडीत‎ अल्पवयीन मुलगी आणि आरोपी‎ देविदास वाघाडे यांना ताब्यात‎ घेवून दिग्रस पोलिसांच्या स्वाधीन‎ करण्यात आले. ही कारवाई‎ पोलिस अधीक्षक डॉ. पवन‎ बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक‎ पीयूष जगताप यांच्या‎ मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक‎ विलास कुळकर्णी, सफौ अरविंद‎ बोबडे, अरूण दोकडे, अर्चना‎ मेश्राम, पवन राजे यांनी पार‎ पाडले.‎