आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:थकबाकी, व्याज व विलंब आकारात सवलत; सात कोटी 22 लाखांचा केला भरणा, साडेतीन हजार ग्राहक कृषिपंप थकबाकीतून मुक्त

यवतमाळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कृषिपंपाच्या नवीन वीज जोडण्या तसेच वीजबिलांच्या वसुलीसाठी थकबाकी, व्याज व विलंब आकारात सवलत देणारे महाकृषी ऊर्जा अभियान महावितरणकडून जाहीर झाले आहे. या धोरणानुसार जिल्ह्यातील तीन हजार ७५१ कृषी पंप ग्राहकांनी आतापर्यंत सात कोटी २२ लाख रुपयांच्या थकबाकीचा भरणा केला आहे. जिल्ह्यात यवतमाळ, पांढरकवडा, पुसद विभाग आहेत. जिल्ह्यातील एक लाख १९ हजार ५५६ कृषिपंप ग्राहकांकडे सद्यःस्थितीत १४४७ कोटी रुपयांची एकूण थकबाकी होती. यातील निर्लेखन, व्याज व विलंब आकाराचे एकूण १३७ कोटी रुपये महावितरणकडून माफ केले जाणार आहे. या कृषी ग्राहकांनी उरलेल्या ८८८ कोटी सुधारीत थकबाकीच्या ५० टक्के रकमेचा वर्षभरात भरणा करावा लागणार होता.

यामध्ये हा भरणा ग्राहकांनी केला, तर उर्वरित ५० टक्के म्हणजे सुमारे ४०० कोटी थकबाकीची रक्कम माफ करण्यात येणार होती. सोबतच त्यांचे थकीत वीज बिलही कोरे होणार होते. अभियानात सर्व उच्च व लघुदाब कृषी पंप ग्राहक तसेच उपसा जलसिंचन योजनेतील चालू, कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांचा समावेश केला. वीज बिल कोरे करण्याची संधी ग्राहकांना मार्चपर्यंत मिळाली. कृषीपंप थकबाकीदार शेतकऱ्यांना कृषी धोरणाअंतर्गत मिळणाऱ्या सवलतीचा लाभ मिळावा, यासाठी महावितरणकडून ग्राहकांच्या वीज बिल दुरुस्तीसाठी जिल्ह्यात तालुकानिहाय शिबिरे आयोजित करण्यात आले. पथनाट्ये, मेळावे, ग्राहकांशी संपर्क साधून सवलतीची माहिती देण्यात आली. यामध्ये ३७५१ ग्राहकांनी सात कोटी २२ लाख रुपयांचा भरणा करून थकबाकीतून मुक्ती मिळाली आहे. या योजनेमुळे जिल्ह्यातील गरजू कृषिपंपधारक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

बातम्या आणखी आहेत...