आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाचे सावट:निरुत्साह : जिल्ह्यात केवळ 22529 वरच थांबली बुस्टर डोसची मात्रा; प्रतिसाद मंदावला

यवतमाळ18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लाभार्थ्यांना पाठवताहेत एसएमएस, खासगी रुग्णालयातही कोरोना लस उपलब्ध

कोविड-१९ च्या चौथ्या लाटेची शक्यता सर्वत्र वर्तवल्या जात आहे. त्यामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून लसीकरण पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तर ९० दिवसांहून अधिक कालावधी झालेल्यांना बुस्टर डोस देण्यास सुरूवात झाली आहे. मात्र, जिल्ह्यातील केवळ २२ हजार ५२९ लाभार्थ्यांवरच बुस्टर डोसची मात्रा थांबली आहे.

मार्च २०२० रोजी कोविड-१९ चा पहिला रुग्ण आढळून आला होता. तेव्हापासून जिल्ह्यात ७९ हजाराहून अधिक नागरिक पॉझिटिव्ह आढळून आले होते. यातून ७७ हजार २३८ जण बरे होवून बाहेर पडले आहे. तर एक हजार ८०३ जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद आहे. वाढलेल्या रुग्ण संख्येवर नियंत्रण मिळविण्याकरिता कोविड प्रतिबंधात्मक लस देण्यास सुरूवात झाली. जानेवारी २०२१ ला मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर लसीकरणाला सुरूवात झाली होती. आ

तापर्यंत १९ लाख ७५ नागरिकांनी पहिला, तर १३ लाख ८९ हजार १५३ दुसरा, असे दोन्ही मिळून ३३ लाख २१ हजार ७५७ लाभार्थींनी लस टोचून घेतली आहे. मध्यंतरी तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लस टोचून ९० दिवस झालेल्यांना बुस्टर डोस द्यावा, असे निर्देश दिले होते. सर्वप्रथम ४२ हजार ७०२ हेल्थ वर्कर यांना बुस्टर डोस देण्याचे नियोजन होते. आतापर्यंत केवळ चार हजार ८२२ लाभार्थींनी बुस्टर डोस घेतला आहे.

तर व्याधिग्रस्त ४१ हजार ९५० जणांपैकी चार हजार ८९८ लाभार्थींनी बुस्टर डोस घेतला. तर ६० वर्षावरील ७० हजार ५० पैकी १२ हजार ८०९, असे मिळून २२ हजार ५२९ लाभार्थीनी बुस्टर डोस घेतला आहे. यावरून बुस्टर डोस घेणाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात निरुत्साह असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. आता बुस्टर डोस घ्यावा, असा एसएमएस लाभार्थींना त्यांच्या मोबाइलवर येत आहे, परंतू खासगीतून घ्यावा, असे त्यात नमूद केले जात आहे. या प्रकारामुळे लाभार्थ्यांमध्ये द्विधा मनस्थिती दिसून येत आहे.

बातम्या आणखी आहेत...