आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्रुपीकरण:वाढत्या अतिक्रमणामुळे कळंब शहराचे विद्रुपीकरण ; बेरोजगारी मुळे वाढले अतिक्रम

कळंबएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

श्री क्षेत्र चिंतामणी नगरीमध्ये यवतमाळ- कळंब बायपास ते बसस्थानक परिसरात वर्धा रोड पर्यंत नगरपंचायत प्रशासनाच्या आशिर्वादाने अतिक्रमण धारकांनी कळसच गाठला आहे. बेरोजगारीच्या नावाखाली बारा ते पंधरा लाखापर्यंत गाळे विकले तर काहींनी दुकानासमोर दुकान काढून भाडे वसुली सुरु केल्याचे चित्र आहे. बेरोजगारी आहे म्हणून अतिक्रमण आहे ही गोष्ट तेवढीच खरी असली तरी अतिक्रमण करण्याला एक मर्यादा असते. कळंब शहरात ग्रामपंचायत असताना बेरोजगारांना व्यवसाय करण्यासाठी पक्के दुकान गाळे बांधून दिले आहे. या दुकान गाळ्याचे मासिक भाडे सुध्दा हजार रुपयांच्या आतच आहे. परंतू नगरपंचायत सिल लावत नाही तोपर्यंत भाडे भरल्या जात नाही. मात्र दुकान वाढवण्याची मर्यादा हायवे रोडला येऊन टेकली आहे. बसस्थानक परिसरात नगरपंचायत मालकीच्या दुकानाची रुंदी जरी वाढली नसली तरी लांबी मात्र १० फुट दुकानाची ४० फुट झालेली आहे. यवतमाळ बायपास पासून बसस्थानक परिसर वर्धा रोडने सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत शहरातील सांडपाणी वाहून जाण्यासाठी लाखो रुपयांचा निधी खर्चून ५ फुट रुंदीच्या दुतर्फा नाल्या बांधकाम केले आहे. मात्र अतिक्रमण वाढवून दुकान वाल्यांनी सांडपाण्याची नाली कुठे आहे. याचा पत्ताही लागू दिला नाही. शेवटी शासनाचे नाली बांधकामावर खर्च केलेले करोडो रुपये कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली गेले व नालीने सांडपाणी वाहून न जाता रोडने धावू लागले आहेत. बेरोजगारी आहे म्हणून शासनाने दिलेल्या संधिचा एवढा दुरुपयोग झाला की बसस्थानक परिसरात नगरपंचायतचे काही दुकाने १२ बाय १२ आहे. तर काही दुकाने ८ बाय १० बांधकाम केले आहे. मात्र व्यावसायिकांनी तीन -तीन शटर्स वाढवून ३० ते ४० फुट समोर आले आहे. तर त्याही पलीकडे जाऊन त्यांना मिळालेल्या दुकान गाळ्यासमोर टीन पत्र्यांची तीन तीन दुकाने काढून १५ ते २० हजार रुपये किराया कमवू लागले आहेत. तर काहींनी १२ ते १५ लाखापर्यंत विकले आहे. याला बेरोजगारी म्हणायचे काय? हा गंभीर प्रश्न असुन याला नगरपंचायत प्रशासन, नगरसेवक यांचा पाठींबा असावा, तेव्हाच अतिक्रमण धारकांनी शहराच्या रस्त्याचे विद्रूपीकरण सुरु केले आहे. बाहेर गावावरून येणाऱ्या किंवा शहरातील दुचाकी स्वरांना दुचाकी ऊभी ठेवण्यासाठी पार्किंगची जागा उरली नाही. एखाद्या दुकान समोर दुचाकी उभी केली तर अतिक्रमण वाढवणारे दुकानदार तंटे उपस्थित करतात. त्यामूळे कळंब बायपास ते बसस्थानक परिसरातील नगरपंचायत दुकान गाळ्यासमोरील अतिक्रमण तसेच बसस्थानक ते चिंतामणी मंदिर रोड आठवडी बाजार परिसरात वाढलेले अतिक्रमण झोपी गेलेल्या नगरपंचायत प्रशासन, पदाधिकारी यांनी तातडीने काढावे अशी कळंब शहरातील नागरिकांची मागणी आहे.

बातम्या आणखी आहेत...