आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासन २०१८ च्या ऑनलाईन बदल्यांमध्ये बहुतांश शिक्षक विस्थापित झाले होते. यातील काही शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली होती. अशा शिक्षकांची ऑफलाईन बदली प्राधान्याने करावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तत्पूर्वी विस्थापित झालेल्या संपूर्ण शिक्षकांची माहिती संकलित करावी, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहे. त्यामुळे आताही दोन वगळता उर्वरीत शिक्षकांच्या बदल्यांना ग्रहणच लागण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या ऑफलाईन बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होत होता. तरीसुद्धा तक्रारींचा खच सुद्धा राहत होता. त्यामुळे शासनाने शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय झाला होता. याची अंमलबजावणी सन २०१८ मध्ये झाली होती. शिक्षकांना प्राधान्याने २० गावांची निवड करावयाची होती. त्या अनुषंगाने संपूर्ण प्रक्रीया पार पडली होती. मात्र, ह्या बदल्या दरम्यान, मोठ्या प्रमाणात शिक्षक विविध कारणामुळे विस्थापित झाले होते. विस्थापीत शिक्षकांनी शेवटी आयुक्तांसह न्यायालयाचे उंबरठे झिजविले होते. न्यायालयाने ह्या शिक्षकांच्या बाजूने निर्णय दिला होता.
मात्र, कोविड-१९ मुळे ह्या बदल्या होवू शकल्या नाही. शेवटी शिक्षक पुंडलिक बुटले, सुनीता बुटले यांनी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. या शिक्षकांची यंदा प्राधान्याने ऑफलाईन बदली करावी, असे आदेश न्यायालयाने दिले होते.
या निकालाचा आधार घेत काही शिक्षक प्राथमिक शिक्षण विभागाकडे अर्ज करीत आहे. अशा शिक्षकांची इत्थंभूत माहिती संकलित करण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने सध्या कार्यरत असलेले ठिकाण, अर्ज दाखल केलेला संवर्ग, सन २०१८ पूर्वी असलेली शाळा, निवड केलेल्या गावांची यादी, यासह इतरही माहिती संकलित केल्या जाणार आहे. संकलीत केलेल्या माहितीनंतर ऑफलाईन बदल्यांबाबत निर्णय घेतल्या जाण्याची शक्यता आहे. या प्रकारामुळे सध्यातरी दोन वगळत उर्वरीत शिक्षकांच्या ऑफलाईन बदल्यांना ग्रहणच लागणार असल्याचे संकेत मिळाले आहे.
आता शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदलीसुद्धा ऑनलाईन पद्धतीनेच केल्या जात आहे. त्या अनुषंगाने ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. पूर्वी ३१ मे पर्यंत तीन वर्ष झालेल्यांनाच अर्ज दाखल करता येत होता. यंदा ३१ जून पर्यंत तीन वर्षाची मुदत देण्यात आली आहे. आहे, परंतू बिंदुनामावलीनुसार रिक्त असलेल्या जागांवरच शिक्षकांना ये-जा करता येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.