आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर परिषद घाटंजी शाळा क्रमांक २ येथील इयत्ता आठवीतील विद्यार्थिनींना मानव विकास मिशन अंतर्गत २५ सायकलींचे वाटप करण्यात आले. विद्यार्थिनींना सायकलचा सुरक्षित वापर व रस्ते वाहन सुरक्षितता याबद्दल माहिती देण्यात आली.अध्यक्षस्थानी मुख्याधिकारी अमोल माळकर, पंचायत समितीतील श्रीकांत पायथाडे, साधनव्यक्ती शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देशमुख, उपाध्यक्ष नरेश कुंटलवार, सविता कंकण, शाळेचे मुख्याध्यापक अरुण पडलवार, कज्जूम कुरेशी, संजय ढवळे यांच्या उपस्थितीत सायकल वाटपाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी शिक्षक गोलर, सिडाम, मडावी, राठोड, बोबडे, वृषाली अवचीत, वेणू मेश्राम, सोनाली पेटेवार, नारायण डाहाके यांनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.