आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुष्पहारांचे वाटप:गौरी पूजनासाठी भाविकांना पुष्पहार वाटप

वनोजाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शेलुबाजार येथील निशांत मल्टिस्टेट को. ऑपरेटिव्ह बँक शाखेच्या स्थानिक संचालक मंडळाच्या वतीने शेलू बाजार परिसरात गौरी स्थापन करणाऱ्या ग्रामस्थांच्या घरी फूलं व पुष्पहारांचे वाटप करण्यात आले. मागील सात वर्षांपासून हार फुल वाटपाचे कार्य यांच्या कडून अविरत सुरू आहे.

गौरी आगमनाप्रित्यर्थ भाविकांचा हारांचा खर्च कमी व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन ‘निशांत’च्या स्थानिक संचालक मंडळाने स्वखर्चाने घेतलेली हार-फुले गरजू भाविकांना पूजेसाठी उपलब्ध करून दिली. या उपक्रमात गोविंदा भेराणे, शरद ठाकरे, गणेश पवार, अमर जैस्वाल, ललित गुप्ता, राम राऊत, सुदर्शन धोटे, डॉ.सुबोध काळे, बाबाराव पवार आदी सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...