आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासनाचे दुर्लक्ष:खातारा अंगणवाडीतून चिमुरड्यांना होतेय निकृष्ट पोषण आहाराचे वाटप; संतप्त पालकांची उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार

पांढरकवडा12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केळापूर तालुक्यातील मौजा खातारा येथील अंगणवाडीद्वारे निकृष्ट तथा अळ्या पडलेला पोषण आहार वाटप केल्याबाबतची तक्रार खातारा येथील कुणाल भिकाजी पेंदोर, संदीप वसंताजी बावणे या पालकांनी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा केळापूर उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

सविस्तर वृत्त असे की मौजा खातारा अंगणवाडीत तक्राकर्त्यांचे मुले अंगणवाडीमध्ये नेहमीच जातात. अशात ३० एप्रिलला दिलेल्या पोषण आहारामध्ये केळी वाटप करण्यात आल. त्याकेळी निकृष्ट दर्जाच्या व अळ्या पडलेल्या असल्याचे पालकांच्या लक्षात आले. लगेचच याबाबत अंगणवाडी सेविकेस विचारणा केली असता, संबंधित अंगणवाडी सेविकेने आम्हाला पोषण आहार हा एकात्मिक बालविकास कार्यालयामार्फत पुरविल्या जात असल्याचे पालकांना सांगितले.

हा प्रकार म्हणजे लहान बालकांच्या जिवाशी खेळण्याचा असल्याने गावातील पालकांनी या संबंधित व्हिडीओ व फोटो अंगणवाडी सेविका समक्ष काढले. सोबतच एकात्मिक बाल विकास कार्यालय येथील विस्तार अधिकारी मंगेश मुंगले यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून याबाबत विचारणा केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत उद्धटपणाची वागणूक दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

चीडलेल्या खातारा येथील पालकांनी शेवटी याबाबतची तक्रार उपविभागीय अधिकारी तथा सहाययक जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. तरी योग्य ती चौकशी करून संबंधितावर कायदेशीर कार्यवाही करावी, अशी मागणी खातारा येथील संतप्त पालकांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...