आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वितरण:भूदान यज्ञ मंडळाच्या वतीने भूमिहीन शेतमजुरांना जमिनीचे पट्टे वितरण; प्रशिक्षण केंद्र पांढुर्णा खुर्द येथे “भूमिहीन शेतमजुरांसाठी पट्टे वितरणाचा कार्यक्रम” आयोजित करण्यात आला

घाटंजी17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील भूमिहीन शेतमजुरांना आत्मनिर्भर जीवन जगता यावे, उपजीविकेचे हक्काचे साधन उपलब्ध व्हावे, या उद्देशाने भूदान यज्ञ मंडळाच्या वतीने दि. ३० एप्रिलला विकास गंगा संस्था, प्रशिक्षण केंद्र पांढुर्णा खुर्द येथे “भूमिहीन शेतमजुरांसाठी पट्टे वितरणाचा कार्यक्रम” आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून भूदान यज्ञ मंडळाचे सचिव एकनाथ डगवार, आर. डी. मेंढे, नायब तहसीलदार घाटंजी तसेच भूदान यज्ञ मंडळ सदस्य व विकास गंगा संस्थेचे अध्यक्ष रंजित बोबडे प्रामुख्याने उपस्थित होते.

आचार्य विनोबा भावे यांनी केलेले लोकहितार्थ कार्य तळागाळात रुजवण्याची आवश्यकता असल्याचे मनोगत एकनाथ डगवार यांनी व्यक्त केले. तर आर. डी. मेंढे यांनी भूमिहीनांना वाटप केलेल्या जमिनीच्या सातबारा वरील नोंदीची प्रक्रिया वेळेत पूर्ण करून देण्याचा विश्वास याप्रसंगी पट्टे धारकांना दिला.

आज अनेक भूमिहीनांना शेतजमिनीचे पट्टे वाटप करण्यात असून या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अमित गाडबैल सचिव विकास गंगा यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भूदान यज्ञ मंडळाच्या वतीने हरिदास वासनिक, छाया काळे, किशोर डोळे व विकास गंगा संस्थेच्या वतीने दीपा सायरे, सोनू व संजय नागोसे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

बातम्या आणखी आहेत...