आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिष्यवृत्ती:नगरपालिकेच्या वतीने दिव्यांगांना पेन्शन वाटप, शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप

घाटंजी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिव्यांगांना पेन्शन, बेरोजगार, तर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती भत्ता नगर पालिकेच्या वतीने नुकताच वाटप करण्यात आला आहे. नगर परिषदेत प्रशासक तथा मुख्याधिकारी अमोल माळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी सभापती अनिल खोडे यांच्या हस्ते दिव्यांगांना पेन्शन, बेरोजगार भत्ता प्रती दोन हजार रूपये, दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तीन हजार ६०० रूपये प्रमाणे चालू आर्थिक वर्ष सन २०२२-२३ चा राखीव निधी चार लाख ८७ हजार २०० रुपये धनादेश वाटप करण्यात आला. आतापर्यंत घाटंजी नगर पालिकेने एकूण २४ लाख ६१ हजार ६८४ रुपये निधी दिव्यांगांना वाटप केला आहे.

यावर्षीच्या लाभामध्ये १०२ बँक ऑफ महाराष्ट्र, १०६ भारतीय स्टेट बँक लाभार्थी संख्या, ६ यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, १४ वि. ग्रामीण बॅंक आणि इतर बँक लाभार्थी, असे एकूण १३० दिव्यांग लाभार्थींना थेट बँक खात्यात लाभ देण्यात आला आहे. या प्रसंगी अनिल खोडे, सहायक प्रकल्प अधिकारी किशोर अम्बुरे, नितीन हातमोडे, राजेश घोडके, रॉजर नारायण, प्रवीण हातमोडे, विक्की शेंद्रे, सदानंद आडे सर्व नगर पालिका कर्मचारी, दिव्यांग प्रतिनिधी सुधाकर दीडशे, जुबेरमिया देशमुख, भोयर, मादेशवार, जितेश रामटेके यांची प्रमुख उपस्थित होते. जे लाभार्थी अजून नोंदीत नाहीत त्यांनी आपली नोंद करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...