आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Amravati
  • Yavatmal
  • Distribution Of Spraying Safety Kits To 70 Farmers; An Initiative Of The World Journalists Ganeshotsav Mandal With The Noble Intention Of Avoiding The Risk Of Death| Marathi News

दिव्य मराठी विशेष:फवारणी सुरक्षा किटचे 70 शेतकऱ्यांना वाटप; मृत्यूचा धोका टाळावा, या उदात्त हेतूने विश्व पत्रकार गणेशोत्सव मंडळाचा पुढाकार

दिग्रस21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतात औषध फवारणी करताना विषबाधा होऊन शेतकऱ्यांचा मृत्यूचा संभाव्य धोका टाळावा, या उदात्त हेतूने येथील विश्व पत्रकार गणेशोत्सव मंडळाकडून जवळपास ७० शेतकऱ्यांना फवारणी सुरक्षा किट वाटप करण्यात आले. कृषी विभागाच्या सहयोगाने राबवण्यात आलेल्या या उपक्रमाला ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

काही वर्षांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यात फवारणी करतांना विषबाधा होऊन शेतकऱ्यांच्या मृत्यूमुळे हा प्रश्न ऐरणीवर आला होता. ही पुनरावृत्ती टळून शेतकऱ्यांना एकाच छताखाली संबंधित किट बाबत सविस्तर माहिती मिळावी, यासाठी विश्व पत्रकार गणेशोत्सव मंडळाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शेतकऱ्यांनी पिकांवर औषधी फवारणी करताना काय काळजी घ्यावी, याची माहिती देण्यात आली. सलग जास्त वेळ फवारणी करू नये, फवारणी करतांना तोंडाला रुमाल बांधावा, कीटकनाशकांची फवारणी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने करू नये, फवारणी केल्यानंतर हात पाय स्वच्छ धुवावेत, या उपाययोजनांची रीतसर माहिती तालुका कृषी अधिकारी एस. एस. राजपूत यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिली.

गणपती मंडळाकडून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. रनिंग स्पर्धा, धनुर्विद्या, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व कपडे वाटप सोबतच अन्य उपक्रमांचा यात समावेश आहे. शेतकरी, विद्यार्थी, खेळाडू, गायक, रुग्ण जवळपास अशा सर्व क्षेत्रातील लोकांसाठी हा गणेशोत्सव मंडळ आपल्या उपक्रमातून धावून जातो आहे.

फवारणी किट वाटप कार्यक्रमावेळी तालुका कृषी अधिकारी एस. एस. राजपूत, शिक्षक मजहर खान, प्रा. यशवंत सुर्वे-पाटील, सरपंच संघटनेचे विठ्ठल आडे, शिवसेना शहर प्रमुख राहुल देशपांडे, संजय चोपडे, डॉ. अलोने, सरपंच पुरुषोत्तम कुडवे, लक्ष्मण टेकाळे, प्रफुल्ल व्यवहारे, अनिल राठोड आदी उपस्थित होते. दैनंदिन कार्यक्रम यशस्वितेसाठी विश्व पत्रकार गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सदानंद जाधव, उपाध्यक्ष जुबेर खान, सचिव धर्मराज गायकवाड, सहसचिव प्रा. यशवंत सुर्वे पाटील, कोषाध्यक्ष लक्ष्मण टेकाळे, सहकोषाध्यक्ष पुरुषोत्तम कुडवे, प्रसिद्धी प्रमुख जय राठोड, सदस्य ऋषिकेश हिरास, प्रशांत झोळ, अजीस शेख, साजिद पतलेवाले परिश्रम घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...