आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:वर्धा येथे महिला वकिलावर झालेल्या हल्ल्याचा जिल्हा वकील संघातर्फे निषेध

यवतमाळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्धा येथे अॅड. योगीता मून यांच्यावर झालेल्या भ्याड व जीवघेण्या हल्ल्याचा यवतमाळ येथील यवतमाळ जिल्हा वकील संघाने तीव्र निषेध नोंदवला आहे. सदर घटनेची सखोल चौकशी करून तातडीने आरोपी विरूद्ध आरोपपत्र दाखल करून विशेष जलदगती न्यायालयात खटला चालवण्यात यावा तसेच वकिलांवर होणाऱ्या हल्ल्यांवर अंकुश लागावा याकरता ‘अॅडव्होकेट प्रोटेक्शन अॅक्ट’ विधानसभेत मंजूर करण्यात यावा, अशी मागणी यवतमाळ जिल्हा वकील संघाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

वर्धा येथे महाराष्ट्र सारख्या पुरोगामी समजल्या जाणाऱ्या राज्यामध्ये नजिकच्या काळात विधीज्ञांवर सातत्याने जीवघेणे हल्ले होत आहेत. या हल्ल्यांमध्ये अनेक विधिज्ञ हे गंभीर स्वरूपात जखमी झालेले पहावयास मिळते. वर्धा येथे दि. २२ मार्च रोजी अॅड. योगीता मून यांच्यावर न्यायालयाच्या दालनात भ्याड व जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली होती. त्याचे पडसाद यवतमाळ येथे देखील बघायला मिळाले.

यवतमाळ जिल्हा वकील संघाने सदर घटनेचा तीव्र विरोध करीत महिला वकिलावर हल्ला करणाऱ्या आरोपी विरूद्ध तत्काळ व सखोल चौकशी करून त्याचे विरूद्ध तातडीने आरोपपत्र दाखल करून फास्ट ट्रॅक न्यायालयात सदरचा खटला चालविण्यात यावा, अशी मागणी वकील संघाने केली आहे. तसेच याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आले आहे. सदर निवेदनात यवतमाळ वकील संघाने वकिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे करत राज्यातील तमाम जिल्हा वकील संघ तसेच हायकोर्ट वकील संघाच्या माध्यमातून वकिलांना सुरक्षा बहाल करणारा कायदा गठीत करण्यात यावा व त्यासाठी अॅडव्होकेट्स प्रोटेक्शन अॅक्ट विधिमंडळात पारीत करावा, अशी मागणी सुध्दा निवेदनातून करण्यात आली आहे.

यावेळी वकील संघाचे अध्यक्ष अॅड. अमीत बदनोरे, सचिव अॅड. आशिष तोटे, सचिव अॅड. संदीप गुजरकर, अॅड. जयसिंह चव्हाण, अॅड. दिंडीलता कांबळे, अॅड. धनंजय मानकर, अॅड. अजय डाखोरे, अॅड. सुमित कांबळे, अॅड. युवराज धांदे, अॅड. मनोज इंगोले, अॅड. मयुरी मडावी, अॅड. राजेंद्र धात्रक, अॅड. मिनाज मलनस, अॅड. संदिप चिद्दरवार, अॅड. जयंत ठाकरे, अॅड. संजय जाऊळकर, अॅड. प्रशांत किर्दक, अॅड. अजय दाणी, अॅड. चंचल टोलीवाल, अॅड. भगवान ठाकरे, आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...