आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आढावा सभा:जिल्हा मध्यवर्ती बँकेची विभागीय आढावा सभा ; अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे असे आवाहन

पुसद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ जिल्हा बँकेच्या पुसद विभागीय कार्यालयातील सर्व शाखा व्यवस्थापक वसुली अधिकारी निरीक्षकांची आढावा सभा विभागीय अध्यक्ष अनुकूल विजयराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेत पुसद,उमरखेड व महागाव तालुक्यातील खरीप पीक कर्ज वाटप, कर्ज वसुली, शाखानिहाय ठेवी, थकीत कर्ज वसुली बाबत, आढावा घेण्यात आला. यावेळी सर्व अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले.

खरीप पीक कर्जासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने पुसद उपविभागात ३१ मे पर्यंत पुसद तालुक्यात ७४ कोटी, उमरखेड तालुक्यात ५१ कोटी तर महागाव तालुक्यात ३२ कोटी असे एकूण तब्बल १५७ कोटींचे खरीप कर्ज य वाटप करण्यात आले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी ठामपणे उभी असून अल्प दरामध्ये कर्ज वाटप केल्या जाते. ३ लाखापर्यंत शून्य व्याजदराने कर्ज वाटप होते. सावकाराच्या दारी शेतकऱ्यांना कर्जासाठी जाण्याची आवश्यकता राहिली नाही. गतवर्षी केलेल्या वाटपापैकी पुसद, उमरखेड व महागाव तालुक्यात ८४, ८४ व ६७ टक्के कर्ज वसुली झाली.

बातम्या आणखी आहेत...