आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदेश:भोंगळ कारभाराच्या चौकशीचे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश; अंत्योदय योजनेत परस्पर 650 रेशनकार्ड वळवल्याचे प्रकरण

यवतमाळ19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आरसीएमएस या ऑनलाइन प्रणालीचे काम गेल्या आठ महिन्यापासून बंद असल्याचे पुरवठा विभागाकडून सांगण्यात येत आहे. असे असतांना तहसीलच्या पुरवठा विभागाने तब्बल ६५० रेशनकार्ड अंत्योदय योजनेत वळते केल्याची गंभीर बाब दैनिक दिव्य मराठीने वृत्त प्रकाशीत करून समोर आणली. हे वृत्त प्रकाशित होताच तहसिल पुरवठा विभागात खळबळ उडाली आहे. या वृत्ताची दखल घेत बुधवार, दि. १५ जून रोजी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. या चौकशीतून मोठा गौडबंगाल समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

देशातील गोर - गरीब आणि गरजू नागरिकांना दोन वेळचे अन्न मिळाले पाहिजे या भावनेतून शासनाच्या वतीने स्वस्त धान्य दुकानातून गरजूंना धान्य दिले जाते. याचा लाभ मिळावा यासाठी सर्वसामान्य नागरीक तहसिल कार्यालयातून रेशन कार्ड काढून घेतात. आरसीएमएस ऑनलाइन प्रणालीवर नवीन रेशनकार्ड काढल्यानंतर त्याचे अपडेटेशन केले जाते. मात्र, गेल्या आठ महिन्यांपासून आरसीएमएस प्रणालीत दोष आढळून येत आहे.

त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना रेशनकार्ड तयार करण्यासाठी तहसिल कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहे. तर दुसरीकडे पुरवठा विभागाने थेट रेशन दुकानदारांसोबत डिल करून लाभार्थींकडून पुरविण्यात आलेल्या प्रमाणपत्राची कोणतीही पडताळणी न करता तब्बल ६५० रेशन कार्ड अंत्योदय योजनेमध्ये टाकले आहे. या मनमानी कारभारासंदर्भात दैनिक दिव्य मराठीने वृत्त प्रकाशित करून हा गंभीर प्रकार उघडकीस आणला. त्या वृत्ताची दखल घेत जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशीतून मोठ्या प्रमाणात गौडबंगाल समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान या वृत्तामुळे तहसील कार्यालयात हा गोरख धंदा चालविणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली .

दोषी आढळल्यास कारवाई करणार
अन्न व नागरी विभागाच्या रेशनकार्ड मॅनेजमेंट सिस्टिम संथगतीने सुरू आहे. दोन दिवसात आरसीएमएस प्रणाली पुर्ण पणे सुरू होणार असल्याचा संदेश सचिवांकडून मिळाला आहे. याचा फायदा घेत यवतमाळ तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागाने अंत्योदय योजनेत रेशनकार्ड वळते केल्याच्या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहे. चौकशीत दोषी आढळल्यास कारवाई करणार आहे.
अमोल येडगे, जिल्हाधिकारी.

बातम्या आणखी आहेत...