आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा रुग्णालयात तयार करण्यात आलेल्या नव्या शस्त्रक्रिया गृहे जिल्हा रुग्णालय प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विद्युत विभाग या दोघांच्या असमन्वयामुळे बंद पडले आहेत. यासंदर्भात दैनिक दिव्य मराठीने वृत्त प्रकाशीत करुन त्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. त्या वृत्ताची दखल घेत आमदार मदन येरावार यांनी यासंदर्भात तातडीने उपाययोजना करण्याच्या सुचना जिल्हा प्रशासनाला दिल्या. तर जिल्हाधिकारी यांनी या दोन्ही विभागांची तातडीने बैठक घेवुन हा विषय मार्गी लावण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येईल असे सांगितले.
जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या गरजू रुग्णांना अद्ययावत वैद्यकीय सेवा याच ठिकाणी उपलब्ध व्हाव्या यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्यात अद्ययावत उपकरणे खरेदी करण्यात येत आहे. याच प्रयत्नातून जिल्हा रुग्णालयात असलेल्या पुर्वीच्या शस्त्रक्रिया गृहाच्या ठिकाणी तब्बल १५ कोटी रुपयांचा निधी खर्च करुन ४ नव्या सुसज्ज आणि सर्व नवनवीन सुविधांनी परिपुर्ण अशा चार शस्त्रक्रिया गृहांची निर्मीती करण्यात आली आहे.
त्याचे काम करणाऱ्या नागपुर येथील एजन्सीने चार महिन्यांपुर्वी काम पुर्ण केले आहे. असे असताना अद्याप पर्यंत या शस्त्रक्रिया गृहातील वातानुकुलीत यंत्रणा कार्यान्वित न झाल्याने ही शस्त्रक्रिया गृहे धूळखात पडलेली आहे. विशेष म्हणजे रुग्णालयातील तीन माळ्यांवरील १२ शस्त्रक्रिया गृहांसाठी ४ कोटी रुपये खर्च करुन नवी वातानुकुलीत यंत्रणा लावण्यात आली आहे. आनखी काही दिवस ही शस्त्रक्रीयागृहे सुरू न झाल्यास त्याचे नुकसान होण्याची शक्यता आहे. असे असतानाही जिल्हा रुग्णालय प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विद्युत विभाग यांच्यामध्ये असलेल्या असमन्वयामुळे हे काम रखडुन पडले आहे.
एसी नसलेल्या शस्त्रक्रिया गृहात शस्त्रक्रिया नव्याने तयार करण्यात आलेल्या शस्त्रक्रिया गृहांसोबतच इतर सर्व शस्त्रक्रीयागृहातील वातानुकुलीत यंत्रणा सध्या बंद असल्याचे सांगण्यात आले आहे. वातानुकुलीत यंत्रणा बंद असलेल्या शस्त्रक्रियागृहांमध्ये सध्या रुग्णांच्या शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. ही बाब गंभीर असुन त्यासंदर्भात े उपाययोजना करुन ही कामे पुर्ण करणे आवश्यक असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.