आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हज प्रशिक्षण:दिग्रस येथे जिल्हास्तरीय हज प्रशिक्षण शिबिराचा 90 यात्रेकरूंना लाभ

दिग्रसएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथे खादी मुल हुज्जाज कमिटीद्वारे एकदिवसीय जिल्हास्तरीय हज प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दोन वर्षापूर्वी झालेल्या कोरोनाच्या उद्रेकानंतर प्रथमच जिल्ह्यातील ९० महिला व पुरुष हज यात्रेकरूंनी सदर शिबिराचा लाभ घेतला. महाराष्ट्र राज्य हज कमिटीचे जिल्हा प्रशिक्षक हाजी एजाजुद्दीन यांनी केंद्र व राज्य शासनातर्फे तयार करण्यात आलेल्या फलक, चित्रफिती, पुस्तक व प्रात्येक्षिकांसह विस्तृत माहिती यावेळी दिली. हजची तयारी, पारपत्र, विमान-प्रवास, परकीय चलन, आंतरराष्ट्रीय नियम, कागदपत्र, उपयोगी व सोबत घ्यावयाची वस्तू , एहराम, विविध इस्लामी धार्मिक स्थळे, हजचे प्रकार, हज-विधी, उमराह, मक्का-मदीना, तेथील मुक्काम, प्रार्थना, घ्यावयाची काळजी व दक्षता, परतीचा प्रवास आदी विषयांवर विस्तृत माहिती दिली. शेवटच्या सत्रामध्ये हज-यात्रेकरूंनी प्रश्नोत्तराद्वारे आपल्या शंका-कुशंकांचे निरसन केले. महाराष्ट्र शासनाच्या हज कमिटीद्वारे तयार करण्यात आलेल्या हज गुरुकिल्ली, उमराहचे पुस्तक, माहिती पत्रके व इतर साहित्याचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. दिव्य कुरआनच्या अध्याय वाचनाद्वारे कार्यक्रमाची सुरवात मृद संधारण विभागाचे निवृत्त अधिकारी शेख करीम यांनी केली. जमीर अहमद यांनी प्रेषित-स्तवन प्रस्तुत केली. संचालन मजहर अहमद खान तर आभार प्रदर्शन निवृत्त वनपाल हाजी नूर खान यांनी केले. मुहम्मद मुदस्सीर, शमा चादरिया, सय्यद रशीद, सय्यद मोईज, नुहं नफिस, सय्यद हारून, मुकीद कुरैशी, सय्यद अदनान, जावेद चादरिया, सय्यद दानिश, शेख मिनहाज, सय्यद कामिल, फैजान गाजी सय्यद जसीम, निवृत्त वनपाल अय्युब खान पठाण, खादी मुल हुज्जाज कमिटीच्या सर्व सभासदांनी शिबिराच्या यशस्वितेसाठी पुढाकार घेतला. दिग्रस, यवतमाळ, उमरखेड, पुसद, नेर, वणी, दारव्हा, ढाणकी, आर्णी, महागाव, येथील हज-यात्रेकरू, त्यांचे नातेवाईक व शहरातील सर्वधर्मीय बांधव यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...