आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासमग्र शिक्षा अविष्कार २०२२-२३ उपक्रमांतर्गत जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था यवतमाळ यांचे द्वारा आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान प्रश्न मंजूषा स्पर्धेचे आयोजन जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था येथे नुकतेच करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डायटचे प्राचार्य प्रशांत गावंडे तसेच विज्ञान विभाग प्रमुख अधिव्याख्याता सारिका पवार, वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. रमेश राऊत, बजरंग बोडके, राठोड तर परीक्षक म्हणून शीतल मनोहर, दत्ताजी ठाकरे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन विषय साधन व्यक्ती वैशाली तुळशीदास गायकवाड यांच्या नेतृत्वात करण्यात आले.
जिल्हा स्तरीय प्रश्न मंजूषा स्पर्धेला विविध फेरी अंतर्गत जिल्ह्यातील विविध तालुक्यातून ४० विद्यार्थी उपस्थित होते. त्यांची गटनिहाय विभागणी करून प्रथम-पूर्व चाचणी घेऊन १५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये गट ब मधून प्रथम क्रमांक विलास डहाळे, सेंट मेरी इंग्लिश मीडियम स्कूल, कनक विजय मलाळ, अनुराग इंगोले, दिनबाई विद्यालय यांनी पटकाविला. तर गट क मधून द्वितीय क्रमांक नंदिनी अनिल मात्रे, साई प्रदीप चिटकेश्वर, अनुष्क संतोष बतकुले यांनी पटकाविला.
तसेच गट इ मधून तृतीय क्रमांक लावण्य नरेंद्र भोयर, हर्षवर्धन गणेश देशमुख, समिक्षा पाटील यांनी पटकाविला. विजेत्या स्पर्धकांना उपस्थितांच्या हस्ते मोमेंटो व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या संपूर्ण स्पर्धा व विजेत्या स्पर्धकांचा सत्कार या कार्यक्रमाचे संचलन वैशाली गायकवाड, निलीमा पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रेखा भगत, सोनाली चिमोटे, शगुप्ता खान, रिजवान, मानव लढे, अभय सावकार, नागसेन सोमकुंवर, महल्ले आदींनी परिश्रम घेतले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.