आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगरपरिषद अंतर्गत असणारे सार्वजनिक नळ कनेक्शन तूर्त बंद न करण्यासाठी निवेदनातून प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी यांना साकडे घातले आहे. नगरपरिषदेद्वारे शहरातील गोरगरीब जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा व त्यांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून शासनाने ३०-४० वर्षांपूर्वी शहरातील गरीब वस्तीत सार्वजनिक नळ योजना राबवली होती. ती आजपर्यंत चालू आहे. परंतु मुख्याधिकाऱ्यांनी नोटीस बजावून सार्वजनिक नळ योजना बंद करण्याचे फर्मान काढले. त्या आदेशामुळे गोर गरिबांच्या तोंडचे पाणी पळवले आहे.
नगरपरिषद कर्मचारी अधिकारी हे सार्वजनिक नळ कनेक्शन बंद करीत आहेत. त्यामुळे जनतेत रोष निर्माण झाला आहे. गोरगरीब वस्तीतील असलेले हे सार्वजनिक नळ कनेक्शन बंद करण्यात येऊ नये अशी विनंती केली आहे.
नळ कनेक्शन बंद झाल्यास आंदोलन करावे लागेल असा इशारा निवेदनातून दिला आहे. प्रशासक तथा सहाय्यक जिल्हाधिकारी यांना बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख उमाकांत पापीनवार यांच्या नेतृत्वात उपजिल्हाप्रमुख दीपक काळे, तालुकाप्रमुख संजय बयास, शहर प्रमुख दीपक उखळकर, तालुका संघटक सोपीनाथ माने, उप तालुकाप्रमुख संतोष राठोड, बाळासाहेब वाळले, लखन राठोड, गोपाल राठोड, अनिल तोंडारे, शोभा कुलकर्णी, वंदना गिरे, तगलपल्लेवार, गजानन मडके, मिलिंद बांडे, ज्योती नेमाडे, माधव नेमाडे, अनिल भेले, संदीप लाभशेठवार, अशोक पवार, विनोद राठोड, शालिक पवार, अशोक नेमाडे आदी शिवसैनिकांनी निवेदन सादर केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.