आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदवी प्रदान:अर्चना धर्मे यांना डॉक्टर ऑफ लिटरेचर पदवी

राळेगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कॅलिफोर्निया पब्लिक युनिव्हर्सिटी, अमेरिकातर्फे दरवर्षी सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीनां दिली जाणारी डॉक्टर ऑफ लिटरेचर (डी. लिट.) ही मानद पदवी राळेगाव येथील न्यू एज्युकेशन सोसायटीच्या सचिव अर्चना धर्मे यांना शनिवार, दि. २८ मे रोजी मुंबई येथील दामोदर नाट्यगृह हॉल येथे कार्यक्रमाचे अध्यक्ष आचार्य, ज्येष्ठ साहित्यिक रतनलाल सोनाग्रा तसेच प्रमुख पाहुणे डॉ. स्नेहा देशपांडे, अर्जुन यादव, कौतुक दांडगे, डॉ. डी. एस. तांडेकर, या मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.

तसेच सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात नेहमीच उल्लेखनीय कार्य करत असल्यामुळे या अगोदर अर्चना धर्मे यांना नुकताच जीवन गौरव पुरस्कार सुद्धा मिळाला होता. आता सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीनां दिली जाणारी डॉक्टर ऑफ लिटरेचर (डी. लिट.) ही मानद पदवी मिळाल्यामुळे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील सर्व गणमान्य व्यक्ती कडून त्यांचे स्वागत करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...