आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खळबळजनक घटना:ट्रॅव्हल्समध्ये डॉक्टर तरूणीचा विनयभंग

यवतमाळ11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैद्राबाद येथून यवतमाळकडे येणाऱ्या ट्रॅव्हल्समधील एका एमबीबीएस तरुणी डॉक्टरचा ट्रॅव्हल्समधील चालकाने विनयभंग केला. ही खळबळजनक घटना शहरातील बसस्थानक चौकात मंगळवार, दि. २ ऑगस्टला सकाळी ६.१५ वाजताच्या सुमारास घडली. यावेळी संतप्त नागरिकांनी त्या चालकाला चांगलेच बदडत अवधुतवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले. असद खान अशरफ अली खान वय ४० वर्ष रा. पुराणी अबादी, बेला मंडळ जि. अदिलाबाद असे त्या चालकाचे नाव आहे.

शहरातील ३१ वर्षीय एमबीबीएस डॉक्टर तरुणी येथील खाजगी रुग्णालयात प्रॅक्टीस करीत आहे. अशात काही कामानिमीत्त ती हैद्राबाद येथे गेली होती. अशात सोमवारी ती डॉक्टर तरुणी तिच्या मोठ्या बहिणीसह हैद्राबाद येथून यवतमाळकडे येण्याकरता खुराणा ट्रॅव्हल्स क्रमांक एमएच-३८-एफ-५८९९ ने रात्री १० वाजताच्या सुमारास निघाली. दरम्यान दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी ६.१५ वाजताच्या सुमारास ती ट्रॅव्हल्स यवतमाळ येथील जुने बसस्थानक चौक परिसरात पोहचली.

यावेळी ट्रॅव्हल्समधील दुय्यम चालकाने यवतमाळ आल्याचा आवाज प्रवाशांना दिला. यावेळी डॉक्टर तरुणी आणि तिची मोठी बहिण दोघेही ट्रॅव्हल्समधून बाहेर उतरण्याची तयारी करीत असतांना आवाज देणाऱ्या ट्रॅव्हल्स चालकाने त्या दोघींकडे येवून अश्लील लज्जास्पद कृत्य केले. यावेळी डॉक्टर तरुणीसह तिच्या बहिणीने आरडाओरड केला.

बातम्या आणखी आहेत...