आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:योगा केल्याने तन अन् मन सुदृढ राहते; तहसील कार्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

दिग्रस7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरातील देशांनी केवळ योग स्वीकारला नाही, तर त्याचा प्रचार आणि प्रसारही केला. अनेक आजारांवर आजही उपाय मिळत नाहीत, मात्र योग अनेक आजारांवर रामबाण उपाय असून प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात योग नक्कीच करावा. खऱ्या अर्थाने योग हे भारतीय संस्कृती व निरोगी तसेच सुदृढ आरोग्याचे प्रतीक असल्याचे मत तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी व्यक्त केले. ते तहसील कार्यालयात आयोजित आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आयोजित योग शिबिरात बोलत होते.

भारतातील ही योग संस्कृती जागतिक पातळीवर अनेक देशांनी स्वीकारली असून,योगासनांचे फायदे त्यांनीही मोठ्या प्रमाणावर अनुभवले आहेत म्हणूनच आजचा २१ जून हा दिन जगभरात योग दिवस म्हणून अत्यंत उत्साहात साजरा केला जातो.

दिग्रस तहसील कार्यालयात महसूल विभाग, पोलीस प्रशासन, पंचायत समिती व नगर परिषद कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तहसील कार्यालयात योग शिबिराला तहसीलदार प्रवीण धानोरकर, पोलीस निरीक्षक पांडुरंग फाडे, नायब तहसीलदार सुधाकर राठोड व अधिकारी वर्ग उपस्थित होते. मान्यवरांनी योगा विषयी आवश्यक माहिती व आजच्या युगात प्रत्येकाला योगासने करणे का आवश्यक आहे हे पटवून दिले. यामध्ये सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून योगाचे धडे घेतले. दिग्रस तहसील कार्यालयांसह शहरात विविध ठिकाणी योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी योगाला अनेकांचा उस्फुर्त प्रतिसाद देखील लाभला.

बातम्या आणखी आहेत...