आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुद्ध मूर्ती:धम्मदेसना समारोहात 111 बुद्ध मूर्तीचे दान

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गगन मलिक फाउंडेशन तथा म. फुले डॉ. आंबेडकर शैक्षणिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने धम्मदेसना तथा १११ बुद्ध मूर्तीच्या दानाचा समारोह आयोजित करण्यात आला असून व्हिएतनाम येथील आदरणीय भंते थिच बिन्ह ताम हे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत तर श्री गगन मलिक हे उद्घाटक राहतील. गगन मलिक यांनी भगवान गौतम बुद्ध या बहुचर्चित चित्रपटामध्ये भगवान बुद्धांची भूमिका केली आहे.

त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली असून सम्राट अशोकांनी भारत देशात ८४ हजार बौद्धस्तुपांची स्थापना केली होती त्याच प्रेरणेतून देशभरात धम्माचा प्रचार व प्रसार करण्याचा त्यांनी मानस व्यक्त केला आहे.

१३ सप्टेंबर रोजी सेंट्रल सेलिब्रेशन हॉल यवतमाळ येथे हा समारोह संपन्न होणार असून व्हिएतनाम येथील पूज्य भंतें सोबतच वंदनिय भिक्खुणी थिच नु एनघिम थात, तसेच देणगीदार ह्युएन ले, लिन्ह फाम, फुक एनघिया, तुंग एनगुयेन व मा.आ.विजय खडसे, चंदन तेलंग, आनंद गायकवाड, विजय डांगे, किशोर भगत, नितीन गजभिये, प्रा. प्रविण कांबळे, प्रा. मधुकर वाघमारे, भीमराव फुसे, अरूण मनवर, डॉ. नीरज वाघमारे, अविनाश भगत, वर्षा मेश्राम, सुधाकर तायडे, इंजी. संजय मानकर, कवडूजी नगराळे, धम्मपाल माने, सदाशिवराव भालेराव, सुखदेव जाधव, सिद्धार्थ भवरे, डॉ. स्मिता वाकडे, प्रा.अनिल काळबांडे,मोहन भोयर, अॅड. श्रध्दा धवने, अरविंद खोब्रागडे, सुनिल वासनिक, पंकज इंगोले, मिलींद मानकर, अमोल कानिंदे, नवनीत महाजन इत्यादींच्या उपस्थिती लाभणार आहे. गगन मलिक फाउंडेशन तर्फे देशभरात ८४ हजार बुद्ध मूर्तीचे दान करण्यात येणार असून त्याचाच एक भाग म्हणून यवतमाळ येथे धम्मदेसना समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती समारोहाचे स्वागताध्यक्ष महेंद्र मानकर यांनी दिली असून यवतमाळकरांनी धम्मदेसनेचा लाभ घ्यावा अशी विनंती त्यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...