आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडोंगराखर्डा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळकरी विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढली. या प्रभातफेरीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी तृणधान्यांचे आहारातील महत्त्व पटवून देणारी फलके हातात घेतली होती. तर मार्गक्रमण करत असताना घोषवाक्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी नागरिकांचे लक्ष्य वेधून घेतले. कृषी विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त नागरिकांना तथा शेतकरी बांधवांना तृणधान्यांचे आहारातील महत्त्व, पौष्टीक घटकांचा आहारात समावेश करणे हे किती आरोग्यदायी आहे याबाबत जनजागृती करण्यात आली.
संयुक्त राष्ट्रसंघाने २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. या अनुषंगाने तृणधान्यांचे महत्त्व जनसामान्यांमध्ये वाढून तृणधान्याच्या उपयुक्त पोषण मूल्यांमुळे आहारामध्ये याचे प्रमाण वाढवण्यावर प्रयत्न केला जाणार आहे. आहारातील प्रमाण वाढवल्यावर सहाजिकच शेतकरी बांधव सुद्धा तृणधान्याची लागवड करून याच्या क्षेत्र वाढ व उत्पादकता वाढीवर भर देतील. खरीप हंगामामध्ये ज्वारी व बाजरीचे क्षेत्र फारच नगण्य किंवा दिसेनासे झाले आहे हे निश्चितच चिंतनीय आहे. आपण सर्वांनी आपल्या रोजच्या आहारात. तृणधान्याचा वापर वाढवल्यास शेतकरी बांधवांना सुद्धा एक प्रेरणा, ऊर्जा मिळून तृणधान्य पिकाचे क्षेत्र तर वाढेलच व त्याला बाजारपेठ सुद्धा उपलब्ध होईल.
सध्याचे परिस्थितीत बदललेली आहारशैली मुळे मधुमेह, रक्तदाब, रक्तक्षय, हार्टअटॅक, बद्धकोष्ठता आदी आजार उद्भवतात. पोष्टीक तृणधान्य मधे ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, कुटकी, सावा, राजगिरा कोद्रा आदी पिकाचा समावेश होत असुन पौष्टिक तृणधान्या चे सेवनामुळे या आजारांना प्रतिबंध करता येतो. तसेच शालेय विद्यार्थी यांच्यामार्फत काढलेल्या प्रभातफेरीसाठी जि. प. शाळेचे मुख्याध्यापक उघडे, आदर्श शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आशिष भिसे, आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक कांबळे, इंगोले, उगेमुगे, वाघ,राऊत तथा विद्यार्थ्यांचे अमुल्य सहकार्य लाभले. बचत गटातील महिला सभेत तृणधान्य वर्षानिमित्त जनजागृती व प्रचार प्रसिद्धी करण्याकरिता कृषि विभागातर्फे कृषि सहाय्यक डोंगरखर्डा महेंद्र ओंकार परिश्रम घेत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.