आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:दंगली पेटू देऊ नका, शांतता राखा; शांतता फेरी काढून वंचित बहुजन आघाडीने दिला संदेश

उमरखेड18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संपूर्ण देश व राज्यांमध्ये सांप्रदायिक शक्तीने डोके वर काढले आहे, जाती जाती आणि धर्मा धर्मात सामाजिक तेढ निर्माण करुन दंगली पेटवण्याचे व विषमतेचे वातावरण निर्माण करुन देश व राज्यातील वातावरण कलुषीत करून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करून हिंदू मुस्लिमांना आपसात लढवण्याचे काम करणाऱ्या कट्टरवादी मानसिकतेचे मनसुबे उधळून लावण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण राज्यामध्ये रविवार, दि. १ मे रोजी शांतता फेरी काढुन जनजागृती करण्याचे आवाहन केले होते. त्यानिमित्त वंचित बहुजन आघाडी तालुक्याच्या वतीने सायंकाळी शहरात शांतता रॅली काढण्यात आली.

शांतता रॅलीत मानवता हाच खरा धर्म आहे, अफवा पसरू नका, असा संदेश हातात फलक घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिला.

याप्रसंगी जिल्हा महासचिव डी. के. दामोधर, जिल्हा महासचिव प्रशांत विनकरे, नगरसेवक संबोधी गायकवाड, एस. के. मुनेस्वर, मार्शल विनोद बरडे, देवानंद पाईकराव, पंकज गायकवाड, बाबुराव नवसागरे, विष्णुकांत वाडेकर, राजु खंदारे, आनंदराव वाहुळे, अविनाश दिपके, गौतम कांबळे, विवेक फलटणकर, सिद्धार्थ धोंगडे, धम्मदीप पाईकराव, धम्मदीप काळबांडे, सुधाकर लोखंडे, सुधाकर कदम, कैलास मासोळकर, अनिल जोगदंडे, मुकिंद गायकवाड, रामा गायकवाड, प्रवेश वाडेकर, विवेक कशिनंद, रोहित घुगरे, विजय गायकवाड, यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी व शाखा प्रमुख, कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...