आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:डिएव्ही शाळा घुग्गुस येथे स्थलांतरित करू नका, विद्यार्थ्यांचा मुक मोर्चा

वणी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेकोलीशी अधिनस्त असलेली डीएव्ही इंग्रजी माध्यमिक शाळा घुग्गुस येथे स्थलांतरित करू नये याकरिता विद्यार्थ्यांसह पालक एकवटले आहे. दरम्यान, बुधवार, दि. २४ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांनी मुक मोर्चा काढून गट शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

वणी तालुक्यात येणाऱ्या वेकोलिने डीएव्ही इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. या माध्यमातून दर्जेदार शिक्षणाचा विद्यार्थ्यांना मिळाला आहे. वेकोली कर्मचाऱ्यांच्या मुलांबरोबरच प्रकल्पग्रस्त, शहरासह तालुक्यातील इतरही असे मिळून जवळपास ८०० विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांचं शैक्षणिक भवितव्य उंचावण्यात शाळेचे महत्वपूर्ण योगदान आहे.

शाळेतील असंख्य विद्यार्थी उच्च पदावर विराजमान आहेत. सध्या जीर्णावस्थेत असलेल्या शाळेच्या इमारतीचा दाखल देऊन ही शाळा तालुक्यातून हद्दपार करण्याचा डाव आखण्यात आला आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बुधवार, दि. २४ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांनी मुक मोर्चा काढला. शाळा इतरत्र हलवू नये म्हणून गटविकास अधिकाऱ्यांसह गट शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शेकडो विद्यार्थी, पालक सुद्धा उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...