आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादहावीचा निकाल जाहीर झाल्यावर आता पालक व विद्यार्थ्यांची पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. दहावीत अनेकांना नव्वद टक्केहून जास्त गुण मिळाले. त्यामुळे चांगल्या महाविद्यालयात प्रवेशासाठी चढाओढ असेल. जिल्ह्यात दहावीचे ३३ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दुसरीकडे अकरावीच्या ३९ हजार जागा आहे. याशिवाय शासकीय व खासगी आयटीआयमध्ये ४ हजार १०० तर शासकीय व खासगी पॉलिटेक्निक मध्ये सहाशे जागा आहे. एकूणच दहावी नंतरच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी जिल्ह्यात ४३ हजार जागा उपलब्ध असल्याने पालक व विद्यार्थ्यांना चिंता करण्याची गरज नाही.
बारावीनंतर मुलींनी पुन्हा एकदा दहावीच्या परीक्षेत बाजी मारल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. तत्पूर्वी जिल्ह्याचा निकाल निकाल एकूण ९६.३१ टक्के एवढा लागला आहे. यात ९७.२२ टक्के एवढा मुलींचा निकाल लागला आहे. त्यामुळे बारावी परीक्षेनंतर मुलींनी पुन्हा एकदा दहावी परिक्षेत बाजी मारल्याचे निकालातून समोर आला आहे. तत्पूर्वी जिल्ह्यातून एकूण ३५ हजार २३६ एवढे विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. यामधून जिल्ह्यात दहावीचे ३३ हजार ९३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. यंदा अनेक विद्यार्थ्यांना ९० टक्के पेक्षा अधिक गुण मिळाले आहे. दुसरीकडे काही विद्यार्थी काठावर पास झाले आहे. काठावर पास होणाऱ्या विद्यार्थ्यांसह एक किंवा दोन विषय नापास असलेल्या म्हणजे एटीकेटी असलेल्या विद्यार्थ्यांनाही पुढील अभ्यासक्रमाला प्रवेश देण्याचे धोरण निश्चित झाले आहे. जिल्ह्यात दहावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा अकरावी अन्य अभ्यासक्रमाच्या जागा जास्त आहे. त्यामुळे सर्वांना प्रवेश मिळेल अशी स्थिती आहे. विशिष्ट महाविद्यालयात प्रवेशासाठी चढाओढ असेल हे मात्र निश्चित.
३५३ ज्यु. कॉलेजस
जिल्ह्यातील ३५३ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या ३३ हजार जागा आहे. त्यात कला शाखेच्या २२ हजार ३२०, विज्ञान शाखेच्या १३ हजार ७६० तर वाणिज्य शाखेच्या २ हजार ४८० जागा आहे. जिल्ह्यात १०२ अनुदानित तर ५८ स्वयंअर्थसाहाय्यित महाविद्यालये आहे.
जिल्ह्यात २ पॉलिटेक्निक
जिल्ह्यात एक शासकीय तर एक खासगी पॉलिटेक्निक महाविद्यालय आहे. त्यात सहाशे जागा आहे. दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वी तंत्रशिक्षण संचालनालयाने प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी सुरू केली आहे. आता निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरताना मार्क लिस्ट अपलोड करता येईल.
प्रवेशाचे वेळापत्रक लवकरच
अकारावी प्रवेशाचे वेळापत्रक लवकरच शिक्षण उपसंचालकांच्या मान्यतेनेच जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान, सिबीयसी दहावी बोर्डाचा निकाल लागायचा आहे. निकाल लागल्यानंतर अकरावीत गुणवत्ता यादीनुसारच प्रवेश देण्यात येणार आहे.
डॉ. जयश्री राऊत, माध्य. शिक्षणाधिकारी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.