आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीची बेदम मारहाण:चारित्र्यावर संशय, पत्नीची हत्या

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चारित्र्यावर संशय घेत पत्नीची बेदम मारहाण करीत हत्या केली. ही घटना शहरातील वाघापूर टेकडी परिसरातील पंचशील नगर येथे रविवार, दि. १ जानेवारीला दुपारच्या सुमारास उघडकीस आली. वैशाली उत्तम गाडेकर वय ३५ वर्ष असे मृत महिलेचे नाव असून उत्तम सखाराम गाडेकर वय ४० वर्ष रा. पंचशील नगर, वाघापूर टेकडी असे मारेकरी पतीचे नाव आहे. रविवारी लोहारा पोलिसांनी मारेकरी पतीला ताब्यात घेतले असून सोमवारी त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

नेर तालुक्यातील उत्तर वाढोणा येथील वैशाली हीचा यवतमाळ शहरातील वाघापूर परिसरात राहणाऱ्या उत्तम गाडेकर याच्यासोबत दहा वर्षापूर्वी विवाह झाला होता. वैशाली हिला एक मुलगा आणि एक मुलगी असून गेल्या काही महिन्यापासून पती उत्तम हा तिच्या चारित्र्यावर संशय घेवून मारहाण करीत होता.

बातम्या आणखी आहेत...