आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या 80 व्या वर्षी निधन:डॉ. सुधाकर आसेगावकर यांचे निधन

दिग्रसएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील सुप्रसिद्ध डॉ. सुधाकर आसेगावकर यांचे ३ सप्टेंबरला मध्यरात्री १२ वाजता ह्रदय विकाराच्या झटक्याने वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले. ‘औषध मी देतो बरा तो करतो‘ असे म्हणत येथील चार पिढ्यांपासून आपली आरोग्य सेवा देणारे डॉ. सुधाकर आसेगावकर शेवटच्या घटकांपर्यंत रुग्ण सेवा करीत होते.

डॉ. आसेगावकर यांच्यावर रविवार, ४ सप्टेंबरला येथील हिंदू मोक्षधाम भूमी येथे दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे २ मुली, १ मुलगा, सून, जवाई, नातवंडे असा आप्त परिवार आहे.

बातम्या आणखी आहेत...