आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरवोद्गार:डॉ. उद्धव गाडेकरांनी कीर्तनाद्वारे  गावोगावी आदर्श तरुण घडवले; श्रद्धांजली कार्यक्रमात शिवशंकर नागरे यांचे प्रतिपादन

पुसद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाची प्रचार तोफ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या डॉ. उद्धव गाडेकर यांनी सदैव हाती ग्राम गीता घेऊन महाराष्ट्रासह अनेक राज्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कार्याचा अविरत प्रचार केला. त्यांनी कीर्तनाद्वारे जनजागृती करून आदर्श तरुण घडविले. त्यासह शासकीय स्तरावरून समृद्ध ग्राम योजनेचा परिपाठ देऊन आदर्श ग्राम बनविले, पायसुळ येथील निवासी शिबिरातून अनेक राज्यातील हजारो विद्यार्थ्यांचे जिवन घडवले त्यांच्या कार्याची प्रेरणा सर्व घेतील. दादाकीर्ती रूपाने अजरामर झालेत ते नित्य स्मरणात राहतील असे प्रतिपादन शिवशंकर नागरे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्राम जयंती दिनी श्रीरामपूर येथे केले.

गुरुदेव सेवा मंडळ श्रीरामपूरच्या वतीने ग्राम जयंती व सामुदायिक श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी माजी उपसरपंच राजू डहाके, प्रमुख पाहुणे म्हणून गुरुदेव प्रचारक शिवशंकर नागरे, विशेष अतिथी म्हणून राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक यशवंत देशमुख होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर सर्वधर्मीय सामुदायिक प्रार्थना घेण्यात आली. शिवशंकर नागरे यांनी डॉ. उद्धव गाडेकर यांच्या कार्याची महती सांगितली. यशवंत देशमुख यांनी नीलेश महाराज देशमुख यांच्या जिवन कार्यावर प्रकाश टाकला.

राजू डहाके यांनी ग्राम गीताचार्य रवींद्र काळबांडे यांच्या स्मृतींना उजाळा दिला. यावेळी नीलेश महाराज देशमुख, डॉ. उद्धव गाडेकर, ग्रामगीताचार्य रवींद्र कालबांडे यांना सामूदायिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गणेश धर्माळे, सूरज केळकर, श्याम चाणेकर, देवानंद जोगदंड, पंकज काळे, तुषार पांडव, आनंद शिरडकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास हभप भारत घोगरे महाराज, अशोक भगत महाराज, प्रचार प्रमुख किसन गरडे, ज्ञानेश्वर इंगोले, गजानन जाधव, अनिल अस्वार, कैलास मस्के, नरेश ढाले, प्रभाकर जाधव, विठ्ठल निस्ताने, सारंग अडसड, महेंद्र विंचूरकर, राम रोगे, छाया पांडव, रुपाली संघई, सुमन देशमुख,रेखा केळकर, रंजना किन्हेकर, सुरेखा बोंपिनवार, आशा थोरात, मीरा काळे, कुसुम धर्माळे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...