आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तक्रार:वरंदळी येथील नालीचे काम निकृष्ट दर्जाचे; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

दिग्रस4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील वरंदळी येथे म.रा.ग्रा.रो.ह. योजनेअंतर्गत करण्यात येत असलेल्या नालीचे काम निकृष्ट होत आहे. या कामात जेसीबीचा वापर करण्यात येत असल्याने अनेक मजुरांवर उपासमारीची वेळ आल्याची तक्रार वरंदळी येथील नागरिकांनी जिल्हाधिकारी यवतमाळ व बांधकाम उपविभाग आर्णी यांच्याकडे केली आहे. वरंदळी येथील नाली बांधकाम हे रोहयोचे काम असून, हे काम जेसीबीच्या सहाय्याने करून गावातील मजूर बेरोजगार होत असून त्यांना रोजगारापासून वंचित ठेवले जात आहे. तसेच नालीच्या कामाचा दर्जा हा अतिशय निकृष्ट असून इस्टिमेटनुसार काम केले जात नाही.

त्यामुळे हे काम तातडीने थांबवून याची चौकशी करावी आणि कायदेशीर कारवाई व्हावी जेणेकरून गावातील नालीच्या कामात होत असलेला भ्रष्टाचार थांबेल आणि बेरोजगारांना रोजगार मिळेल असे दिलेल्या तक्रार निवेदनात नमूद आहे. या नाली बांधकामात नालीतील बेड मुरूम भरुन आणि सिमेंट दगडाचा कमी वापर केला जात आहे. नालीची खोली आणि रुंदी देखील कमी आहे. यासोबतच वरंदळी येथील पाणंद रस्ता सुद्धा जेसीबीच्या सहाय्याने केला जात असून, तो सुद्धा मजुरावर अन्याय करणारा आहे. त्यामुळे या बांधकाम ठेकेदारावर कारवाई करून बांधकाम थांबवावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा खुशाल पवार, रंजना राठोड, प्रीती जाधव यांनी निवेदनातून दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...