आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यश:ड्रीमलँड स्कूलची विद्यार्थीनी प्राप्ती बहादुरेला 98 टक्के; सर्वांकडून कौतुकांचा वर्षाव

दिग्रस9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील प्राप्ती गणेश बहादुरे हिने दहावीच्या परीक्षेमध्ये ९८. ८० टक्के गुण मिळवल्याने तिचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. ही स्थानिक ड्रीमलॅंड इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी आहे. ५०० पैकी तिने ४८७ गुण प्राप्त केले.

महाराष्ट्र कला संचालनालय मुंबईद्वारा घेण्यात येणाऱ्या रेखा-कला परीक्षेच्या ७ गुणांचा यात समावेश असून त्याची एकूण टक्केवारी ९८. ८० एवढी होते. प्राप्ती बहादुरे ही सुरूवातीपासूनच अभ्यासासह शालेयउपक्रमातही अग्रेसर होती. तिचे वडील गणेश बहादुरे हे राष्ट्रीय विद्यालयात कला शिक्षक म्हणून कार्यरत आहे. तिने यशाचे श्रेय महेश दुधे, वैशाली दुधे, ड्रीमलॅंड इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व आई-वडिलांना दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...