आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिके उद्ध्वस्त:मुसळधार पावसाने जिल्ह्यातील दहा प्रकल्प पुन्हा ओव्हरफ्लो, विसर्ग सुरू

यवतमाळ17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या आठवड्यात ओसरलेल्या पावसाने जिल्ह्यात रविवार दि. ११ सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा दमदार एन्ट्री केली आहे. रविवारी सकाळपासुन सतत कोसळलेल्या या पावसाने जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प पुन्हा एकदा तुडुंब भरले आहेत. त्यापैकी एक-दोन नव्हे तर तब्बल १० प्रकल्पांमधुन पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर पुन्हा आलेल्या या पावसाने शेतकऱ्यांच्या हाती शिल्लक शेतीपीकांचेही नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे.

यंदा राज्यात सर्वदुर पावसाने हाहाकार उडवला आहे. जुलै महिन्यात झालेल्या पावसाने जिल्ह्यात सर्वदुर हाहाकार माजवला होता. त्यानंतर काही दिवसांतच ऑगस्ट महिन्यातही पावसाने रिपरीप कायम ठेवली होती. त्याचा फटका मोठ्या प्रमाणात शेतीपीकांना बसुन खरिपाची लागवड झालेल्या एकुण क्षेत्रापैकी निम्मे क्षेत्र म्हणजे सुमारे साडेचार लाख हेक्टरवरील पीके पावसाने उद्ध्वस्त केली होती. मध्यंतरी काही दिवस पावसाने चांगलीच उघडीप दिली. त्या काळात चांगले उन्ह तापल्याने जिल्ह्याचे तापमानही वाढले होते. उकाड्यात वाढ झाल्याने नागरिक हैराण झाले होते. इतकेच नव्हे तर अचानक वाढलेल्या तापमानाने शेतात शिल्लक राहीलेली पीके जळणार की काय अशी अवस्था निर्माण झाली होती. त्यातच उघडीप दिलेल्या पावसाने गणेशोत्सवाच्या काळात पुन्हा हजेरी लावली.

त्यामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र जिल्ह्यात निर्माण झाले होते. दरम्यान शनिवारी रात्री जिल्ह्यात पावसाने पुन्हा हजेरी लावली. रविवारी आणि सोमवारी दोन दिवसात तर धुंवाधार पाऊस जिल्ह्यात झाला. या दमदार पावसाने सर्वत्र हाहाकार उडवून दिला. जोरात झालेल्या या पावसामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या हाती शिल्लक राहिलेल्या शेतीपीकांचेही नुकसान होण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या चिंतेत पुन्हा वाढ झाली आहे. यातच संपुर्ण जिल्ह्यात कोसळलेल्या या पावसाने जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये असलेल्या पाणी साठ्यात वाढ होवुन प्रकल्प पुन्हा ओव्हरफ्लो झाले. त्यात ६ प्रकल्प शंभर टक्के भरुन त्यांच्या सांडव्यावरुन पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. तर उर्वरीत प्रकल्प त्यांच्या क्षमतेच्या जवळपास भरले आहेत. त्यामुळे सोमवारी एक-दोन नव्हे तर तब्बल १० प्रकल्पांमधुन पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. जिल्ह्यात विविध भागांमध्ये असलेल्या या प्रकल्पांमधुन पाण्याचा विसर्ग सुरू झाला असल्याने जवळपास सर्वच तालुक्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दोन दिवस सतत सुरू असलेल्या पावसामुळे नदी, नाले ओसंडुन वाहत असताना आता त्यात प्रकल्पांमधुन सोडण्यात आलेल्या पाण्याची भर पडली असल्याने बऱ्याच तालुक्यांमध्ये नदी काठावर असलेल्या गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

सात प्रकल्प भरले शंभर टक्के : जिल्ह्यात असलेल्या मोठ्या प्रकल्पांपैकी पुस धरण शंभर टक्के भरल्याने त्याच्या सांडव्यावरुन विसर्ग सुरू आहे. अरुणावती धरणाचे २ दरवाजे उघडण्यात आले आहेत. बेंबळा धरणाच्या २० दरवाज्यांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गोकी, वाघाडी, सायखेडा, नवरगांव आणि बोरगाव हे प्रकल्प पुर्ण भरले असुन त्यांच्या सांडव्यावरुन पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अधरपुर धरणाचे २ दरवाजे उघडण्यात आले आहेत. अडाण प्रकल्पाच्या ५ दरवाजामधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. एकाचवेळी १० प्रकल्पांमधुन पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने जिल्ह्यात नदीकाठच्या आणि मोठ्या नाल्यांच्या बाजुला असलेल्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पाण्यामुळे अनेक मार्ग बंद : दारव्हा मार्गावरील बोरी अरब येथील नदीवर पुलाचे काम सुरू असल्याने तयार करण्यात आलेला पर्यायी पुल पाण्याखाली गेल्याने यवतमाळ - दारव्हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. याशीवाय घाटंजी तालुक्यातील अडाण नदीची पाण्याची पातळी वाढत असून चिंचोली येथिल पुलावरून पाणी वाहत असल्याने किन्ही-चिंचोली-तळणी मार्गावरील वाहतूक बंद आहे. त्यातच उघडीप दिलेल्या पावसाने गणेशोत्सवाच्या काळात पुन्हा हजेरी लावली. त्यामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र जिल्ह्यात निर्माण झाले होते.

दरम्यान शनिवारी रात्री जिल्ह्यात पावसाने पुन्हा हजेरी लावली. रविवारी आणि सोमवारी दोन दिवसात तर धुंवाधार पाऊस जिल्ह्यात झाला. या दमदार पावसाने सर्वत्र हाहाकार उडवून दिला. जोरात झालेल्या या पावसामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या हाती शिल्लक राहिलेल्या शेतीपीकांचेही नुकसान होण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या चिंतेत पुन्हा वाढ झाली आहे. यातच संपुर्ण जिल्ह्यात कोसळलेल्या या पावसाने जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये असलेल्या पाणी साठ्यात वाढ होवुन प्रकल्प पुन्हा ओव्हरफ्लो झाले. त्यात ६ प्रकल्प शंभर टक्के भरुन त्यांच्या सांडव्यावरुन पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. तर उर्वरीत प्रकल्प त्यांच्या क्षमतेच्या जवळपास भरले आहेत. त्यामुळे सोमवारी एक-दोन नव्हे तर तब्बल १० प्रकल्पांमधुन पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. जिल्ह्यात विविध भागांमध्ये असलेल्या या प्रकल्पांमधुन पाण्याचा विसर्ग सुरू झाला असल्याने जवळपास सर्वच तालुक्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दोन दिवस सतत सुरू असलेल्या पावसामुळे नदी, नाले ओसंडुन वाहत असताना आता त्यात प्रकल्पांमधुन सोडण्यात आलेल्या पाण्याची भर पडली असल्याने बऱ्याच तालुक्यांमध्ये नदी काठावर असलेल्या गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

सात प्रकल्प भरले शंभर टक्के : जिल्ह्यात असलेल्या मोठ्या प्रकल्पांपैकी पुस धरण शंभर टक्के भरल्याने त्याच्या सांडव्यावरुन विसर्ग सुरू आहे. अरुणावती धरणाचे २ दरवाजे उघडण्यात आले आहेत. बेंबळा धरणाच्या २० दरवाज्यांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गोकी, वाघाडी, सायखेडा, नवरगांव आणि बोरगाव हे प्रकल्प पुर्ण भरले असुन त्यांच्या सांडव्यावरुन पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अधरपुर धरणाचे २ दरवाजे उघडण्यात आले आहेत. अडाण प्रकल्पाच्या ५ दरवाजामधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. एकाचवेळी १० प्रकल्पांमधुन पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने जिल्ह्यात नदीकाठच्या आणि मोठ्या नाल्यांच्या बाजुला असलेल्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पाण्यामुळे अनेक मार्ग बंद : दारव्हा मार्गावरील बोरी अरब येथील नदीवर पुलाचे काम सुरू असल्याने तयार करण्यात आलेला पर्यायी पुल पाण्याखाली गेल्याने यवतमाळ - दारव्हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. याशीवाय घाटंजी तालुक्यातील अडाण नदीची पाण्याची पातळी वाढत असून चिंचोली येथिल पुलावरून पाणी वाहत असल्याने किन्ही-चिंचोली-तळणी मार्गावरील वाहतूक बंद आहे.

बातम्या आणखी आहेत...