आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांना विमा कंपनी‎:अत्यल्प विमा मिळाल्याने‎ शेतकऱ्यांवर दुहेरी संकट‎

महागाव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महागाव तालुक्यातील शेतकरी‎ दरवर्षी मोठ्या प्रमाणात कापूस, तूर,‎ सोयाबीन व इतर कडधान्याची‎ खरिपात पेरणी करतात. पण‎ निसर्गाच्या अवकृपेमुळे खरीप‎ हंगाम धोक्यात येते. त्यामुळे‎ शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा‎ सामना करावा लागतो. दरवर्षी‎ शेतकऱ्यांकडून विविध कंपनीच्या‎ माध्यमातून पीक विमा काढण्यात‎ येत असला तरी पिकाचे नुकसान‎ होऊनही शेतकऱ्यांना विमा कंपनी‎ कडून अत्यल्प आर्थिक मदत मिळत‎ असल्याने शेतकऱ्यांवर दुहेरी संकट‎ ओढवल्याचे दिसून येत असून‎ नुकसान प्रमाणे विमा देण्याची‎ मागणी खडका परिसरातील‎ शेतकऱ्यांनी तहसीलदारा सह‎ तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे‎ निवेदनातून केली आहे.‎

तालुक्यातील शेतकऱ्यांनी‎ २०२२-२३ या आर्थीक वर्षात खरीप‎ पीक विमा मोठ्या प्रमाणात काढला‎ होता. जेणे करून झालेल्या पिकाचा‎ नुकसान भरपाई पोटी आर्थिक‎ हातभार होईल, या उद्देशाने विमा‎ काढला असला तरी अॅग्रीकल्चर‎ क्रॉप इन्शुरन्स कंपनीने झालेल्या‎ नुकसानीची अल्प प्रमाणात भरपाई‎ देऊन शेतकऱ्याच्या तोंडाला पाने‎ पुसली असून त्याची कुचेष्टा‎ चालवली आहे.

शेतकऱ्यांना‎ वाळीत टाकणाऱ्या कंपनीने वाढीव‎ पीक विमा देऊन आर्थीक हातभार‎ लावाला. त्यामुळे शेतकऱ्यांची‎ झालेली नुकसान भरपाई निघू‎ शकेल अन्यथा शेतकऱ्यांवर‎ आत्महत्या सारखी वेळ येऊ शकते.‎ शेतकऱ्यांना वाढीव पीक विमा‎ मिळाला नाही तर आमरण‎ उपोषणास बसण्याचा इशारा‎ आनंदराव देशमुख, पंजाब देशमुख,‎ विश्वासराव देशमुख, देवराव‎ देशमुख, किरण हनवते, गणेश‎ हनवते, जगदीश देशमुख, सुरेश‎ हनवते, श्रीकांत देशमुख, सुरेश‎ कार्लेकर, संजय देशमुख, सुभद्रा‎ देशमुख, किशोर हनवते सह आदी‎ शेतकऱ्यांनी निवेदनात नमूद केले‎ आहे.‎

बातम्या आणखी आहेत...