आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात उष्णतेत वाढ होत असतानाच शुक्रवार दि. ७ एप्रिल रोजी सायंकाळी अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवघ्या काही वेळात जोरदार बरसलेल्या या पावसाने रस्त्यावरुन पाण्याचे पाट वाहु लागले. सायंकाळी शहरात नागरिक कामामध्ये असताना अचानक आलेल्या या पावसाने सर्वांची तारांबळ उडवून दिली . यंदा उन्हाळ्याची सुरूवात होताच फेब्रुवारी महिन्यात तापमानाचा पारा भडकला होता. मात्र मार्च महिन्यामध्ये बरेच दिवस ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस यामुळे तापमान मर्यादीत राहीले.
मात्र त्या काळात आलेल्या अवकाळी पावसाने आणि काही ठिकाणी झालेल्या गारपिटीने सुमारे ४ हजार हेक्टरवरील शेतीपीकांचे नुकसान झाले. त्यानंतर एप्रिल महिन्याची सुरूवात होताच तापमान वाढु लागले होते. हे तापमान ४० अंशांपर्यंत पोहचत नाही तोच पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दर्शविला होता. त्यात गुरूवार दि. ६ एप्रिल रोजी जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण कायम होते. शुक्रवारी सायंकाळी अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली.
नेर तालुक्यात गारपिटीने नुकसान शुक्रवारी दुपारी नेर तालुक्यात जोरदार पावसाने अचानक हजेरी लावली. यावेळी पावसासोबत सोसाट्याचा वारा आणि गारपीट झाली. यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार तालुक्यात साधारणतः ४०० ते ५०० हेक्टरवरील गहू, भाजीपाला, फळबाग, अंबा, संत्रा याचे नुकसान झाले आहे. आज शासकीय सुटी असल्याने नुकसानीचा अचूक अंदाज मिळाला नसला तरी गव्हाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले.
दोन बैलांसह एका गायीचा वीज पडुन मृत्यू महागाव तालुक्यातील थार (बु) येथील युवा शेतकरी रेणुकादास शिंदे यांचे संगम शिवारात शेत आहे. ते आपले बैल घेवुन शेत काम करीत असतानाच दुपारी १.३० वाजता पाऊस सुरू झाला. त्यामुळे शिंदे यांनी काम थांबवुन बैल झाडाखाली बांधले. दरम्यान अचानक वीज कोसळून दोन्ही बैल जागीच ठार झाले. . याचप्रमाणे महागाव तालुक्यातील पेढी या गावी दिगंबर भराटे यांची एक गाय दुपारी अचानक वीज पडल्याने ठार झाली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.