आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सकारात्मक चर्चा‎:लेखी कार्यवृत्त दिल्यामुळे पुसदमध्ये संपमागे‎

पुसद‎25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्यातील ८६ हजार कर्मचारी,‎ अभियंते व अधिकारी तसेच ४० हजाराच्या वर ‎कंत्राटी कामगार दि. ३ जानेवारी २०२३ रोजी ‎ ‎ मध्यरात्रीपासून महाराष्ट्र राज्य विद्युत ‎कर्मचारी,अभियंते,अधि कारी संघर्ष समितीच्या ‎नेतृत्वाखाली तीनही वीज कंपन्यांतील ३१‎ कामगार संघटना ७२ तासाच्या संपावर गेले होते.‎ विविध संघटनांना संलग्न असलेल्या कंत्राटी कामगाराच्या संघटना या संपाला पाठिंबा देऊन ‎सहभाग घेतला होता.वीज कंपन्यांचे‎ खाजगीकरण करण्यात येऊ नये,फेंचाईशी‎ करण्यात येऊ नये,नवीन कामगार भरती‎ करावी,कंत्राटी कामगाराला कायम करण्यात‎ यावे.

या व इतर मागण्या बाबत विस्तृत चर्चा‎ राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र‎ फडणवीस यांच्या समवेत तिन्ही कंपन्यांचे‎‎ अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तसेच इतर‎ अधिकारी व ३१ कामगार संघटनांचे पदाधिकारी‎ यांची संयुक्त बैठक सह्याद्री अतिथी गुरुवार‎ दुपारी दोन ते साडेचार वाजेपर्यंत संपन्न झाली.‎ त्या बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय झाल्यामुळे‎ संयुक्त पत्रकार परिषद घेऊन झालेले निर्णय‎ जाहीर करण्यात आले व कामगार संघटनांनी‎ संप मागे घेण्याची घोषणा केली.पुसदमध्ये‎ देखील संप मागे घेण्यात आला आहे.संप मागे‎ घेत असल्याबद्दल महाराष्ट्र राज्य विद्युत‎ कर्मचारी,अभियंते, अधिकारी संघर्ष समिती‎ पुसदच्यावतीने माहिती देण्यात आली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...