आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मातेला निरोप‎:पावसात निघाली दुर्गा माता‎ विसर्जन मिरवणूक‎

दिग्रस‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिग्रस शहरात ३० तर ग्रामीण भागात‎ ६४ देवीची स्थापना झाली होती. नऊ‎ दिवस देवीची नित्य नेमाने आरती‎ पूजा करून दि.४ ऑक्टोबर रोजी‎ देवी विसर्जनाला सुरवात झाली. तर‎ काहींनी दसरा सण झाल्यावर दि. ६‎ ऑक्टोबरला देवी विसर्जन‎ करण्यासाठी भाविक भक्तगण‎ मिरवणुकीत सामील झाले.‎ दि. ६ ऑक्टोबर रोजी दुपारी‎ रिमझिम पाऊस सुरू होता.‎

भक्तगणांनी ओले चिंब होऊन‎ डीजे, टाळ मृदंगच्या ठेकावर ताल‎ धरला. लहान मुले, महिला व‎ नागरिकांनी आनंदाने नाचत गाजत‎ देवीला निरोप दिला. मिरवणुकीत‎ गुलाल उधळत देवीच्या‎ विसर्जनासाठी भक्तगण तल्लीन‎ झाले होते. दिग्रस येथे दि. ४ ते ६‎ ऑक्टोबर रोजी दुर्गा देवी‎ विसर्जनाला सुरुवात झाली होती‎ रात्री पर्यंत ''जय अंबे'' च्या‎ जयघोषात भाविकांनी‎ ठीक-ठिकाणी मातेला निरोप दिला.‎ यावेळी पावसापासून देवीला संरक्षण‎ मिळण्यासाठी ताडपत्री छताचा‎ वापर करण्यात आला होता. यावेळी‎ दिग्रस शहरात ठाणेदार धर्मराज‎ सोनुने यांनी तगडा पोलीस बंदोबस्त‎ तैनात ठेवला होता.‎

बातम्या आणखी आहेत...