आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रायोगिक‎ तत्वावर गावाची निवड:जिल्ह्यातील 18 गावांमध्ये ई-चावडी प्रणाली यशस्वी‎

यवतमाळ‎8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ई चावडी प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात‎ जिल्ह्यातील १८ गावांची निवड‎ करण्यात आली आहे. यापैकी काही‎ गावे ऑनलाइन करण्यात आली आहे.‎ यात जिल्हा प्रशासनाने प्रायोगिक‎ तत्वावर यवतमाळ तालुक्यातील‎ मडकोना गावाची निवड करण्यात‎ आली होती. मडकोना गावातील काम‎ पूर्ण झाल्याने आता १६ तालुक्यातील‎ १८ गावांची निवड करण्यात आली‎ असून, येथे तलाठी वर्गास बोलावून ई‎ चावडीचे कामकाज केले जात आहे.‎ सध्या महसूल विभागातील केवळ‎ सातबारा ऑनलाइन आहे. आता‎ महसूलच्या २१ प्रकारच्या सुविधा‎ ऑनलाइन करण्यासाठी पाऊल‎ उचलले आहे. केंद्र सरकारने‎ डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड‎ मॉडर्नायझेशन’ हा प्रकल्प सुरू केला‎ आहे. नवीन तंत्रज्ञान वापरून ‘इज‎ ऑफ डुइंग बिझनेस अंतर्गत‎ नागरिकांची कामे सोपी व्हावी हा या‎ प्रकल्पाचा प्रमुख उद्देश आहे.

यानुसार‎ महसूल विभागाशी संबंधित गाव नमुने‎ १ ते २१ अर्थात तलाठी दप्तराचे‎ अद्ययावतीकरण सुरू झाले. यातील‎ गाव नमुना नंबर ७ आणि नमुना नंबर‎ १२ अर्थात ७/१२ तसेच नमुना ६ आणि‎ नमुना ८ (अ) हे देखील ऑनलाइन‎ होणार आहे. यामुळे महसुली‎ करभरणा व वसुली प्रक्रिया शंभर‎ टक्के ऑनलाइन होणार आहे.‎ सभागृहात संपूर्ण तलाठ्यांची विशेष‎ बैठक व्यवस्था करून त्यांच्यासोबत‎ कोतवालांची मदत घेत ई चावडीमध्ये‎ संपूर्ण तलाठी सजा कार्यालयातील‎ दस्तावेज व्यवस्थित अपलोड केले‎ आहेत किंवा नाही याची पडताळणी‎ आणि अपलोडिंगचे काम सुरू आहे.‎ ई चावडीमध्ये संपूर्ण तालुक्याचे‎ कामकाज हे १०० टक्के व्हावे असे‎ प्रयत्न सुरू आहे.‎

बातम्या आणखी आहेत...