आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रकल्प:महसूलच्या 21 सुविधांसाठी इ- चावडी प्रकल्प ; प्रायोगिक तत्त्वावर जिल्ह्यात मडकोना गावात काम सुरू

यवतमाळ25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासनाच्या इ-चावडी प्रकल्पाद्वारे नागरिकांना महसूल विभागातून मिळणाऱ्या २१ प्रकारच्या सेवा ऑनलाइन मिळणार आहेत. यासाठी जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर मडकोना गावाची निवड करण्यात आली असून तेथे हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. यातून सर्व महसुली कर आता घरूनच भरता येईल. यासाठी तलाठी कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. शासनाचेही कर थकवणाऱ्यांवर नियंत्रण राहिल. सध्या महसूल विभागातील केवळ सातबारा ऑनलाइन करण्यात आला आहे. त्यासाठी मोठा कालावधी लागला होता. आता महसूलच्या २१ प्रकारच्या सुविधा ऑनलाइन करण्यासाठी पाऊल उचलले आहे. केंद्र सरकारने ‘डिजिटल इंडिया लॅण्ड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन’ हा प्रकल्प सुरू केला आहे. २०१३ मध्ये महाराष्ट्र सरकारने या प्रकल्पावर काम सुरू केले. यात जमिनीचे अभिलेख, सातबारा, सर्वप्रकारचे नकाशे या सर्वांचे आधुनिकीकरण सुरू आहे. नवीन तंत्रज्ञान वापरून ‘इज ऑफ डुइंग बिझनेस अंतर्गत नागरिकांची कामे सोपी व्हावी हा या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश आहे. यानुसार महसूल विभागाशी संबंधित गाव नमुने १ ते २१ अर्थात तलाठी दप्तराचे अद्ययावतीकरण सुरू झाले. यातील गाव नमुना नंबर ७ आणि नमुना नंबर १२ अर्थात ७/१२ तसेच नमुना ६ आणि नमुना ८ (अ) हे देखील ऑनलाइन होणार आहे. यामुळे महसुली करभरणा व वसुली प्रक्रिया शंभर टक्के ऑनलाइन होईल.

असे आहेत फायदे सर्व्हे नंबरनिहाय, खातेदारनिहाय वार्षिक शेत साऱ्याची रक्कम, थकीत करांची मिळणार माहिती. बिन शेती झालेल्या जमिनीवर उभ्या राहिलेल्या सोसायट्यांना दरवर्षी एनए टॅक्स भरावा लागतो. महसूलच्या नोटिसा आल्यानंतर त्याची माहिती समजल्याने कर भरण्यासाठी होणारी धावपळ आता बंद होईल.सुटीच्या दिवशीही कर भरण्याची सुविधा.

प्रकल्पाचा थेट नागरिकांना लाभ जमीन सारा, बिनशेती जमिनीचा सारा, नजराणा रक्कम, शिक्षण उपकर, रोजगार हमी उपकर, ग्रामपंचायत उपकर, जिल्हा परिषद उपकर, अनधिकृत वापरलेल्या जमिनींचे किंवा अनधिकृत बाबींचे दंड ऑनलाइन भरण्याची सुविधा यात असणार आहे. शेतकऱ्यांकडून किती सारा घ्यायचा? हे स्पष्ट होईल. पैसे योग्य हेडखाली शासनास मिळेल. त्यासाठी तलाठी किंवा महसूल कार्यालयात न जात घरूनच ऑनलाइन पद्धतीने नागरिक त्यांचा करभरणा करू शकतील.

२१ प्रकारच्या सेवा ऑनलाइन ^यापूर्वी इ-सातबारा केला. त्याला लाभ होत आहे. त्याच धर्तीवर आता महसूल विभागाच्या एक ते २१ प्रकारच्या सेवा - सुविधांचा नागरिकांना ऑनलाइन लाभ होईल. यासाठी मडकोना गावात प्रायोगिक तत्त्वावर सेवा देण्यासाठी कामे सुरु केले आहेत. मोठी कामे असल्याने थोडा विलंब लागेल. ललितकुमार वऱ्हाडे, निवासी उपजिल्हाधिकारी

बातम्या आणखी आहेत...