आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धान्यासाठी ग्राहकांकडून तगादा:ई-पॉस मशीन बंद, रेशन वाटप ठप्प ; उत्तरे देताना दुकानदारांच्या नाकीनऊ

यवतमाळ6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील सामान्य नागरिकांना स्वस्त धान्य काही दिवसांपासून मिळत नसल्याने मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अत्याधुनिक प्रणाली म्हटल्या जाणारे ई-पॉस मशिन आठवडाभरापासून बंद असल्याने येथील स्वस्त धान्य दुकानदारांकडे धान्य उपलब्ध असूनही शिधापत्रिका धारकांना त्यांच्या हक्काच्या धान्यापासून मुकावे लागत आहे. राज्यस्तरावरील बायोमेट्रिक प्रणालीच्या सर्व्हर मध्ये बिघाड झाल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. दुसरीकडे रेशनच्या धान्यासाठी कार्ड धारकांचा तगादा मात्र वाढला आहे.

शासनाने गरिबांसाठी पाठवलेले स्वस्त धान्य त्यांच्या पर्यंत न पोहोचता काळ्या बाजारात पोहोचत असल्याच्या राज्यभरातून तक्रारी प्राप्त होत असल्याने शासनाने आधार कार्डच्या मदतीने बायोमेट्रिक द्वारा धान्य वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शासनाकडून धान्य दुकानदारांना ई-पॉस मशीन २०१७ मध्ये देण्यात आले होते. या मशीन कालबाह्य झाल्या आहेत. त्यामुळे वारंवार तांत्रिक अडचणी येत आहेत. गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात धान्य वाटप ऐन सणासुदीच्या दिवसात बंद झाले आहे. ई-पॉस यंत्रणेसाठी एनआयसी नवी दिल्ली या कंपनीकडून ई-पॉस मशीन दुकानदारांना दिल्या गेल्या आहेत.

तसेच या मशीनची देखभाल दुरुस्ती करण्याचे काम बंगळुरू येथील एका कंपनीला दिले आहे. देखभालीची सर्व जबाबदारी या कंपनीकडे सोपवली आहे. ई-पॉसचा वापर सुरू झाला तेव्हा टु-जी इंटरनेट वापरले जात होते. त्यामुळे ई-पॉस मशीनमध्ये टु-जी यंत्रणेचा वापर केला होता. २०२० पर्यंत या मशीन व्यवस्थित सुरू होत्या. मात्र आता फोर-जी यंत्रणेचा वापर सुरू झाला असून, लवकरच फाईव्ह-जीचा वापरदेखील केला जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...