आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमृत महोत्सव:प्रत्येक वकील विनामूल्य लढवणार एक प्रकरण

परतवाडा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये असे म्हणतात. कारण न्यायालयीन प्रक्रिया अगदी किचकट आणि वेळ काढू असल्याने सामान्य माणसाला जर स्वत: हाताळायचे असल्यास, तर अनेक अडचणीचा अनुभव घ्यावा लागतो. सर्वांना न्याय मिळावा या उदात्त हेतूने अचलपूर वकील संघाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवावर निर्णय घेत अचलपूर वकील संघातील प्रत्येक सभासद गरजू व्यक्तीचे वर्षातून एक प्रकरण विनामूल्य लढवेल असा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जवळपास २०० वकील यात सहभागी झाल्याने परिसरातील २०० गरजूंना न्यायायालयातील प्रकरणासाठी मोफत सेवा प्राप्त होऊ शकेल.

न्यायालयीन प्रकरणासाठी प्रत्येकजण वकिलांची नियुक्ती करू शकेलच असे नाही. म्हणूनच गरजू नागरिकांचे हित लक्षात घेता वकील संघाच्या वतीने हा उदात्त निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयात सहभागी झालेल्या २०० वकिलांमुळे किमान २०० गरजूंना न्यायालयीन कामकाजासाठी नि:शुल्क सेवा मिळणार असल्याने संघाच्या सामाजिक दातृत्व जपणाऱ्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

न्यायालयाच्या वतीने लोक अदालतीसारख्या प्रकरणातील तत्काळ न्याय मिळवून देण्यासाठी योजना राबवल्या जात असून, त्याचा अनेकांना फायदा होत असताना अचलपूर वकिल संघाने घेतलेला निर्णय महत्त्वपूर्ण ठरून अनेक गरजूंना न्याय मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा आशावाद वकील संघाचे अध्यक्ष नितीन चौधरी, उपाध्यक्ष ॲड. आमीर मसुद, सचिव ॲड. नीलेश धोपे, सहसचिव ॲड. रंजू मोपारी, कोषाध्यक्ष ॲड. शबाना मोहम्मद, सदस्य ॲड. विशाल घाटे, ॲड. सुशील राऊत, ॲड. हर्षी दाभाडे, ॲड. सतीश अबृक यासह ज्येष्ठ विधीतज्ञ ॲड. सुरेंद्र घुलक्षे, ॲड. विजय गोडबोले, ॲड. संतोष बोरेकार, रवींद्र गोरले, वासुदेव वाटाणे आदींनी व्यक्त केला आहे.

प्रत्येक गरजू व्यक्तीला न्याय मिळावा, हाच उद्देश
न्यायालयात दाद मागणाऱ्या व्यक्तिंना वकिलाअभावी कुठलीही अडचण येऊ नये याकरता वकील संघाचा प्रत्येक सभासद वर्षातून एक प्रकरण मोफत हाताळतील. शासन आपल्या स्तरावर मोफत वकील उपलब्ध करून देतात. मात्र संघाच्या वतीने सरसकट गरजूंना न्याय मिळवून देण्यासाठी वर्षातून एक प्रकरण मोफत लढतील यात सर्वच वकिलांचा सहभाग असेल.- ॲड. नितीन चौधरी, अध्यक्ष, वकिल संघ, अचलपूर

बातम्या आणखी आहेत...