आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इको फ्रेण्डली:कांद्यापासून तयार केली इको फ्रेण्डली गणेश मूर्ती

कारंजाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कांदा या पिकाला मिळालेल्या बाजार भावामुळे कांद्याने ठीक ठिकाणी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची ही खंत शासनापर्यंत न पोहोचल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र शेतकऱ्यांना शासनाकडून कोणतीही आर्थिक मदत मिळाली नाही. हे लक्षात घेत जय भवानी जय शिवाजी या मंडळाने यावर्षी कांद्यापासून गणपती बाप्पा तयार करण्याचा निर्णय घेऊन एक आगळी वेगळी इको फ्रेंडली गणेशमूर्ती तयार केली आहे.

त्यामुळे पर्यावरण पूरक गणेश मूर्तीची निर्मिती होत असल्याने, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मदत होईल. तसेच शेतकऱ्यांच्या या गणेश मंडळाला कमीत कमी पैशात पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार झाली आहे. मुर्ती तयार करण्या करिता ५० ते ५५ किलो कांदा, अर्धा किलो बारीक तार, ०२ मीटर पांढऱ्या रंगाचा कापड व गवताच्या सहाय्याने सहा शेतकऱ्यांच्या मुलांनी व गजानन राऊतकर नावाच्या शेतकरी यांनी ही गणेश मुर्ती तयार केली मुर्ती तयार केली आहे.

मुर्ती तयार करण्याकरता तीन दिवसाचा कालावधी लागला असून, प्रत्येक दिवसाला आठ तास वेळ ही मूर्ती तयार करण्यासाठी लागला आहे. ही मुर्ती संकल्पना कामरगाव येथील राहुल गावंडे यांच्या संकल्पनेतून जय भवानी गणेश मंडळाच्या वतीने तयार करण्यात आली आहे. कामरगाव येथील जय भवानी गणेश मंडळातर्फे दरवर्षी पर्यावरण पुरक अशा निरनिराळ्या गणपती बाप्पाच्या मुर्ती साकारण्याचे काम मंडळाकडून केले जाते. या वर्षी कांद्या पासून गणेशमूर्ती तयार करून एक वेगळा संदेश दिला आहे.

गणरायाकडेच घातले साकडे
यावर्षी कामरगाव परिसरात शेतकऱ्यांनी कांद्याचे भरभरून उत्पन्न घेतले असता. मे महिन्यात कांदा विक्री करताना कांद्याचे दोन ते चार रुपये किलो भावाने मागणी होत असल्याने कांद्याची साठवणूक शेतकऱ्यांकडून करण्यात आली होती. मात्र सध्या कांद्याला कोंब फुटले असून कांदा सडू लागले तरीसुद्धा शासनाकडून शेतकऱ्यांच्या हिताचे उपाययोजना करण्यात आल्या नसल्याने आता शेतकऱ्यांनी गणरायाकडेच कांद्याचा गणपती तयार करून साकडे घातले आहे. त्यामुळे आता तरी सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देईल का? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. तिकडे आपल्याकडे आपल्या देशात अमृत महोत्सव मोठ्या उत्साहाने पार पडला असता मात्र शेतकऱ्यांकडे कोणत्या सरकारचं लक्ष नसल्याचे दिसून येते त्यामुळे शेतकरी वर्गात नाराजीचा सूर निघत असल्याचे दिसत आहे. राहुल गावंडे, युवा शेतकरी कामरगाव

बातम्या आणखी आहेत...