आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हे:दोन मुलींचे शैक्षणिक नुकसान; सायबर कॅफे चालकावर गुन्हे

यवतमाळ6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैसे घेवून देखील परीक्षेचा फॉर्म न भरता दोन मुलींचे शैक्षणिक नुकसान करणाऱ्या एका सायबर कॅफे चालकावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना पिंपळगाव बायपास परिसरातील कानन सायबर कॅफेवर घडली असून गिरीश गेडाम वय ३५ वर्ष रा. वाघापूर, यवतमाळ असे गुन्हा नोंद करण्यात आलेल्या सायबर चालकाचे नाव आहे.

शहरातील पिंपळगाव परिसरातील अनुश्री पार्कमधील नंदिनी मोकळकर या १८ वर्षीय विद्यार्थीनी बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्याने ती नीट परिक्षेची तयारी करीत होती. अशात पिंपळगाव बायपास मार्गावर असलेल्या गिरीश गेडाम याच्या कानन सायबर कॅफेत परीक्षेचे फॉर्म भरून दिल्या जात असल्याची माहिती तिला मिळाली. त्यावरून ती दि. ६ मे २०२२ रोजी सकाळी त्या सायबर कॅफेवर राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परिक्षा करीता फॉर्म भरण्यासाठी गेली. यावेळी गिरीश याला राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षेचा फॉर्म भरून देण्यासंदर्भात विचारणा केली.

यावेळी गिरीश याने फॉर्म भरण्यासाठी कागदपत्रे आणि वैयक्तीक माहिती मागितली. त्यानंतर फॉर्म भरून झाल्यानंतर नंदिनी हिने त्याला ७०० रूपये रोख आणि एक हजार रूपये फोन पे द्वारे ऑनलाइन पाठविले. यावेळी नंदिनी हिने गिरीश गेडाम याला फॉर्मची दुय्यम प्रत मागितली असता, नेट प्रोब्लेम सांगत त्याने प्रिंट देवून शकत नसल्याचे सांगितले.

दरम्यान त्याला वारंवार फोन करून फॉर्मची दुय्यम प्रत बाबत मागणी केली असता, तो उडवाउडवीची उत्तरे देत प्रिंट देण्यास टाळाटाळ करीत होता. अशात दि. १ जूनला नंदिनी कानन सायबर कॅफेवर गेली असता गिरीश गेडाम याला भरलेल्या फॉर्मची दुय्यम प्रत मागितली असता, त्याने नंदिनी हिच्या वॉट्सअॅपवर पाठविली. त्यावेळी नंदिनी हिला विश्वास झाला की, कानन सायबर कॅफेवर राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षेचा फॉर्म भरलेला आहे. दरम्यान ती परीक्षेचा अभ्यासाला लागली होती. त्यानंतर दि. १२ जुलैला राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परिक्षेची हॉल तिकीट वेबसाईटवर प्रसिध्द झाल्याचे मैत्रिणीकडून कळाले. त्यामूळे तिने सायबर कॅफे चालक गिरीश गेडाम याला हॉल तिकीटची प्रिंट मोबाइलवर पाठविण्याची मागणी केली. मात्र त्याने पुन्हा टाळाटाळ केली. शहर पोलिसांनी शनिवारी विविध गुन्हे नोंद केले आहे.

दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने हॉल तिकीट
दरम्यान दुसऱ्या दिवशी हॉल तिकीट नंदिनी हिच्या वॉट्सअॅपवर पाठविली. त्यावर आसन क्रमांक, परीक्षेचा वेळ आणि तारीख २१ जुलै असे नमूद होते. मात्र परिक्षा १७ जुलैला असल्यामूळे हॉल तिकीटावर २१ जुलै कसे याबाबत गेडाम याला विचारणा केली. त्यावेळी गेडाम याने कम्प्युटरवर पाहून सांगतो असे म्हणत पुन्हा दि. १७ जुलै असा उल्लेख करून ती हॉल तिकीट नंदिनी हिच्या वॉट्सअॅपवर दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने हॉल तिकीट पाठविले

बातम्या आणखी आहेत...