आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंमलबजावणी करावी:लोकसेवा हक्कांची प्रभावी अंमलबजावणी करावी; नागरिकांना तत्पर सेवा द्या, आयुक्त नरुकुल्ला

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नागरिकांना ऑनलाईन सेवा विहित वेळेत तत्परतेने देवून महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचना राज्य लोकसेवा हक्क आयोग अमरावती विभागाचे आयुक्त रामबाबु नरुकुल्ला यांनी दिल्या.

लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीबाबत आयुक्त नरुकुल्ला यांनी बचत भवन येथे यवतमाळ जिल्ह्याचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिह दुबे, उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी, सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता मनिष राजभोज, जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीनाथ वाडेकर, उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, महाआयटीचे जिल्हा समन्वयक फिरोज पठाण प्रामुख्याने उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्यात पात्र व्यक्तींना परदर्शीक, कार्यक्षम व समयोचित लोकसेवा देण्याकरीता महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ हा दिनांक २८ एप्रिल २०१५ पासून अंमलात आला आहे. या अधिनियमांतर्गत सदर अधिनियमांची जिल्हा पातळीवर प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने संबंधित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांचे संनियंत्रण करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी सर्व विभाग प्रमुखांकडून नियमित आढावा घेण्याचे सांगितले.

तसेच सर्व विभागा प्रमुखांनी आपले सरकार पोर्टलवरील सर्व सेवा ऑलनाईन पद्धतीनेच पुरविण्याचे निर्देश दिले. कोणतेही प्रकरण प्रलंबित ठेवण्यात येवू नये असेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यवतमाळ जिल्ह्यातील विभागनिहाय सेवांचा तपशिल सादर करून माहिती दिली. या बैठकीला जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार, तहसीलदार कुणाल झाल्टे, मुख्याधिकारी माधुरी मडावी, अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, उपनिबंधक रमेश कटके तसेच विविध विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...