आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:कारंजा शहरात सर्वधर्मीय बांधवांनी शुभेच्छा देत केली ईद साजरी; कश्यप बंधूंनी केली वझू करण्यासाठी व पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था; सर्वच मशिदींमध्ये केली सामूहिक ईदची नमाज अदा

कारंजा (लाड)17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुस्लिम बांधवांचा पवित्र सण रमजान ईद मंगळवारी उत्साहात साजरा करण्यात आला. ईदनिमित्त विविध मशिदींमध्ये मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज अदा केली.

नमाजासाठी रंगीबेरंगी कपडे परिधान करून मुस्लिम बांधवांनी बायपासजवळील ईदगाह मैदानावर सकाळी ९ वाजता सामूहिक नमाज अदा केली. तत्पूर्वी शहरातील सर्वच मशिदींमध्येही नमाज अदा करण्यात आली. यावेळी सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. दरवर्षीप्रमाणे कश्यप बंधूंतर्फे वझू करण्यासाठी व पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. ईदची नमाज काजी मोहम्मद इक्बाल यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आली.

याप्रसंगी शहर -ए- काझी रफिउल्ला काझी यांनी उपस्थितांना उपदेश केला. यावेळी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस नेते मो. युसूफ पुंजानी, माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके, माजी नगराध्यक्ष शेषराव ढोके, माजी गटनेते ॲड. फिरोज शेकूवाले, माजी उपाध्यक्ष एम.टी.खान, माजी उपाध्यक्ष जुम्माभाई पप्पूवाले, माजी सभापती सलीम गारवे, जावेद्दोद्दीन इस्लामोद्दीन, निसार खान, जाकीर शेख, सलीम प्यारेवाले, अ.एजाज अ.मन्नान, युनूस पहेलवान, जाकीर अली, सय्यद मुजाहिद, मौलाना अब्दुल मजीद, ॲड.जुनेद खान, ॲड. परवेज खान, ॲड. सुभान खेतीवाले, दूरसंचार अभियंता रहेमान शेकुवाले, प्रा. बदरोद्दीन कामनवाले, जुम्मा बंदूकवाले, हुसेन बंदूकवाले, चाँद मुन्नीवाले, कय्यूम जट्टावाले, इस्माईल गारवे, अब्दुल रशीद, चाँद शाह, आरिफ मौलाना, इरशाद अली, इरफान खान, माजी नगराध्यक्ष अरविंद लाठिया, माजी नगराध्यक्ष ॲड. विजय बगडे, शंकरलाल कश्यप, भारिप जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण, माजी उपाध्यक्ष बिसू पहेलवान, तौसिफ मामदानी, मोहम्मद शेकूवाले, इम्रान शेख आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...