आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईद मिलन:सद्भावनाचा ईद मिलन  ठरला ऐतिहासिक; शिवकमल लॉन मध्ये ईद मिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता

पुसद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुमारे तीन महिन्यापूर्वी अस्तित्वात आलेल्या सद्बभावना मंचतर्फे बुधवार, दि. ११ मे रोजी आयोजित ईद मिलन कार्यक्रम पुसदसाठी ऐतिहासिक ठरला आहे. पुसद व परिसरात मागील काळात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे जातीय सलोखा वाढीला लागावा या हेतूने पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांना समन्वयक पदाची जबाबदारी देत छत्रपती शिवजयंती दिनी सद्भावना मंच अस्तित्वात आला. मागील तीन महिन्यात झालेल्या सर्वधर्मीय महापुरुषांच्या जयंती व सण मध्ये सद्भावना मंच चे सर्वधर्मीय सदस्य हिरीरीने सहभागी झाले होते.त्याच प्रमाणे काल येथील शिवकमल लॉन मध्ये ईद मिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याचे पूजन नंतर समन्वयक शरद मैंद यांनी प्रास्ताविकातून सद्भावना मंचच्या माध्यमातून प्रशासनाच्या यादीत लागलेला पुसदला लागलेला अति संवेदनशीलतेचा डाग पुसुन काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तर सदस्य डॉ. मोहम्मद नदीम यांनी छत्रपती शिवाजी महाराज सदभावनेचे प्रतीक असल्याने त्यांचे पुजन करून ईद मिलन कार्यक्रम सुरू करण्यात आला. ही ऐतिहासिक घटना असल्याचे सांगितले. राज्य वक्फ बोर्डचे अध्यक्ष आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांनी सद्भावना मंचच्या माध्यमातुन द्वेषाचे वातावरण प्रेमात परावर्तीत होईल असा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार इंद्रनील नाईक यांनी सोशल मीडियाच्या चुकीचा वापरामुळे सामाजिक एकोप्याला तडा जात असून महापुरुषांच्या चरित्र वाचनावर युवकांनी भर देण्याचे आवाहन केले. प्रमुख वक्ता अब्दुल वाजीद कादरी इंजिनिअर यांनी भाषा समजत नसल्याने गैर समज निर्माण होतात म्हणून अजाण मध्ये वापरल्या जाणाऱ्या अरबी शब्दांचा अर्थ समजावुन सांगत सामाजिक सलोखा राहिल्यास कोणीही विकास रोखू शकणार नाही अश्या शब्दात मार्गदर्शन केले. व्यासपीठवर रा. स्व. संघचे माजी विभागीय संघ चालक प्रा. सुरेश गोफणे, शिवसेना नेते राजन मुखरे, नप मधील भाजप माजी गटनेते निखिल चिद्धरवार, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सूरज डुबेवार, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष दिगंबर जगताप प्रज्ञा पर्व २०२२ चे अध्यक्ष विठ्ठल खडसे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन मनीष अनंतवार यांनी तर शेख कयुम यांनी आभार व्यक्त केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाला महसूल, पोलीस, कृषी, नगर परिषद आदी शासकीय अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, विविध राजकीय, सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक क्षेत्रातील तसेच सर्व धर्मीय नागरिक उपस्थित होते. शेवटी उपस्थित शेकडो नागरिकांनी सामुहिक भोजनासह शिरखुरम्याचा आस्वाद घेतला.

बातम्या आणखी आहेत...