आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुक:जिल्ह्यात आठ गट, सोळा गणांची वाढ, जि.प., पं. स. निवडणुकीची रणधुमाळी

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दोन महिन्यांपूर्वीच मार्च २०२२ मध्ये मुदत संपलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी चालू झाली आहे. गतवेळी पेक्षा यंदा आठ गट आणि १६ गणांची वाढ जिल्ह्यात झाली आहे. गुरूवार, दि. २ जून रोजी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्रारूप मसुदा प्रसिद्ध केला असून, आक्षेप, हरकती बुधवार, दि. ८ जून रोजी पर्यंत नोंदवता येणार आहे. कोविड-१९ चा वाढलेला संसर्ग आणि ओबीसीचे राजकीय आरक्षणाचा गुंता वाढल्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने विहित मुदतीत कार्यक्रम पूर्ण करता आला नाही. परिणामी, मार्च २०२२ मध्ये जिल्हा परिषद, पंचायत समितीत प्रशासक राज चालू झाला. मध्यंतरी राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेवरून प्रशासनाने जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण याची माहिती संकलित केली होती. मात्र, अर्थसंकल्पीय अधिवेशनात ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घ्यावयाचा नाही, असा ठराव घेतला होता. दरम्यान, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट होता. मागिल महिन्यातील सुनावणी मध्ये निवडणूक प्रक्रीया पूर्ण करावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. या आदेशानुसार निवडणूक आयोगाने गट, गणाची प्रारूप प्रस्ताव घेऊन बोलावले होते. या प्रस्तावाला आयोगाने मान्यता देवून जिल्हाधिकाऱ्यांना प्रारूप मसुदा प्रसिद्ध करण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्या सूचनेनुसार गुरूवार, दि. २ जून रोजी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी गट आणि गणांचा प्रारूप मसुदा प्रसिद्ध केला आहे. गतवेळी पेक्षा यंदा आठ गट आणि १६ गण वाढले आहे. यावर आक्षेप, हरकती नोंदवण्याकरिता बुधवार, दि. ८ जून रोजी पर्यंत मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत दाखल झालेल्या आक्षेप, हरकतीवर सुनावणी घेवुन त्यानुसार दुरुस्ती केल्या जाणार आहे. त्यानंतर अंतीम प्रारूप मसुदा प्रसिद्ध केल्या जाईल. या सर्व प्रक्रीया सुरू झाल्याने आता एकंदरीतच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी चालू झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

ग्रमीण भागात उत्सुकता शिगेला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे गण आणि गट यांची संख्या वाढली आहे. वाढलेल्या या गण आणि गटांमुळे कुणाला फायदा होणार आणि कुठल्या राजकीय पक्षाला त्याचा फटका सहन करावा लागणार यासंदर्भात चर्चांना आता ऊत आला आहे. इतकेच नव्हे तर निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या असल्याने ग्रामीण भागात निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे.

बातम्या आणखी आहेत...