आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला बी बियाण्याची मदत करून त्यांना आधार देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत श्री एकवीरा देवी संस्थानने आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबाला बी, बियाण्यांची मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासली. जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला एकाच दिवशी बियाणे वाटप करून मदत करण्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सामाजिक संस्था, संघटना, सेवाभावी संस्था, राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, कर्मचारी संघटना यांना आवाहन केले.
त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सामाजिक कार्यात अग्रक्रमाने पुढाकार घेवुन समाजाच्या मदतीला धावून जाणाऱ्या महागाव तालुक्यातील हिवरा (संगम) येथील श्री एकवीरा देवी संस्थानने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला महसुल विभागाने सुचविले लेप पेरे व क्षेत्रानुसार सोयाबीन, कपाशी, तुर बियाण्यांच्या बॅगा भेट दिल्या. यामध्ये हिवरा (संगम) येथील कलावती सुभाष राऊत, ईजनी येथील ऋतिक जनार्दन रावते, दारासिंग चतरू पवार यांना मदत करून सामाजिक दायित्व जपलं यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीधर वाडेकर, यांच्याहस्ते लाभार्थी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला बियाणे वाटप करण्यात आले.
यावेळी संशोधन अधिकारी सिद्धांत राठोड, प्रभारी तहसीलदार डॉ. संतोष आदमुलवाड, नायब तहसीलदार एस. आर. देशमुख, श्री एकवीरा देवी संस्थानचे अध्यक्ष अनंतराव कदम, सचिव आनंदराव कदम, कोषाध्यक्ष साहेबराव पाटील कदम, विश्वस्त अशोक जयस्वाल, गजानन कदम, देविदास कदम, चंद्रशेखर कदम, मोरेश्वर पांडे, प्रकाशराव कदम, तलाठी एम. एम. शेख, तलाठी एस. एन. कुंदर्गे, महसुल कर्मचारी जीवन जाधव, अमोल जामकर, विष्णु दरोडे यांच्यासह आत्महत्या ग्रस्त कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.