आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हत्या:शिविगाळ केल्याने लहान भावाकडून मोठ्याची हत्या

घाटंजी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गावात दारू पिऊन शिवीगाळ करणाऱ्या मोठ्या भावाची लहान भावाने रागाच्या भरात हत्या केली. ही धक्कादायक घटना घाटंजी तालुक्यातील साखरा येथे गुरूवारी सायंकाळी ६ च्या सुमारास घडली. विशाल जयवंत मेश्राम (३२) असे मृताचे नाव आहे.

घाटंजी तालुक्यातील साखरा गावातील मेश्राम कुटुंबातील मोठा मुलगा विशाल हा विवाहीत असून त्याला एक मुलगा आहे. तो ट्रॅक्टर चालक होता, त्याला दारूचे व्यसन जडले होते. त्यामुळे घरात वारंवार वाद होत असल्याने कुटुंबीय त्रस्त झाले होते. लहान भाऊ दिलीप उर्फ लाल्या घरी असतांना विशाल हा मद्यप्राशन करून घरी आल्यावर नेहमी प्रमाणे भांडण करत धिंगाणा घालत होता.

यावेळी लहान भावाचा राग अनावर झाला व रागाच्या भरात लोखंडी सबलीने मारहाण केली.यात मोठ्या भावाला डोक्यात मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच घाटंजी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरता पाठवला. या प्रकरणी घाटंजी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आले असून पोलिसांनी मारेकरी दिलीप उर्फ लाल्या मेश्राम याला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास उपविभागीय अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घाटंजी ठाणेदार सुषमा बावीस्कर करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...