आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रगती महिला मंडळाच्या वतीने रविवार, दि. १२ मार्च रोजी प्रगती सोसायटीतील ज्येष्ठ नागरीक भवनमध्ये नृत्य स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत वयोवृद्ध महिलांसुद्धा थिरकल्या.दरवर्षी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रगती महिला मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यंदा महिला दिनानिमित्त नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. येथील ज्येष्ठ नागरिक भवनात रविवार, दि. १२ मार्च रोजी महिला दिनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नीमा देशमुख, तर प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. शितल जयस्वाल ह्या होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मीरा घाटे यांनी केले. संचलन वैशाली खोंड, तर आभार विजया देशपांडे यांनी मानले.
यावेळी प्रगती महिला मंडळाच्या अध्यक्षा चित्रा देशपांडे, वैशाली खोंड, विजया देशपांडे यांच्यासह मनीषा कंठाळे, सोनू धामणकर, सरिता खत्री, रेखा गंगमवार, शुभदा निसाळ, अनुराधा सांबरे, स्मिता राऊत, गीता तपके, शैलेजा चरेगावकर, प्रमीला पराते, निर्मला गुल्हाने, रंजना शिरभाते, संगीता करणेवार, पुंडलिक, अश्विनी भाकरे, दिपाली पांचाळ, पुनम खत्री, वनिता गांडुळे, वंदना देमापुरे, योगिनी काळपांडे, कल्याणी देशपांडे आदी महिलांसह प्रभागातील शेकडो महिलांनी उपस्थिती लावली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.