आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संहिता लागू:जिल्ह्यातील शंभर ग्रामपंचायतींत निवडणुकीची आचार संहिता लागू

यवतमाळ13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील शंभर ग्रामपंचायतच्या निवडणुकीची नोटीस शुक्रवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील तहसीलदारांनी निर्गमित केली आहे. त्या शंभर ग्रामपंचायतीत आजपासून निवडणुकीच्या आदर्श आचार संहितेला सुरूवात झाली आहे. दरम्यान, १८ डिसेंबर रोजी मतदान, तर २० डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील ७३ ग्रामपंचायतच्या निवडणुकांचा समावेश होता. आता चौथ्या टप्प्यातील १०० ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम ९ नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केला होता. यामध्ये आर्णी तालुक्यात सात, बाभूळगाव एक, दारव्हा आठ, दिग्रस पाच, घाटंजी सहा, मारेगाव नऊ, नेर एक, पुसद १२, राळेगाव आठ, उमरखेड चार, वणी १९, यवतमाळ १६, झरी जामणी तालुक्यातील चार ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यानुसार शुक्रवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी तहसीलदारांनी निवडणुकीची नोटीस जाहीर केली. प्रामुख्याने सोमवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी पासून नामनिर्देशन पत्र स्विकारण्यास सुरूवात होणार आहे.

झेडपी निवडणुकीची सर्वांना उत्सूकता
जिल्हा परिषद, पंचायत समिती पदाधिकाऱ्यांची मुदत मार्च महिन्यातच संपुष्टात आली आहे. मुदत संपल्यानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषदेवर प्रशासकाची नेमणूक केली. डिसेंबर महिन्यापर्यंत निवडणुका होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, अद्यापही जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टीने निर्णय घेतल्याच गेला नाही. त्यामुळे निवडणुकीची उत्सुकताच सर्वांनाच लागल्याचे स्पष्ट दिसत आहे.

बातम्या आणखी आहेत...